दहिसरमध्ये SBI बँकेत गोळीबार, व्यक्तीच्या छातीत गोळी झाडून हल्लेखोरांनी २ लाख पळवले

दहिसरमध्ये SBI बँकेत गोळीबार, व्यक्तीच्या छातीत गोळी झाडून हल्लेखोरांनी २ लाख पळवले

दहिसरमध्ये SBI बँकेत गोळीबार, व्यक्तीच्या छातीत गोळी झाडून हल्लेखोरांनी २ लाख पळवले

मुंबईच्या दहिसर पूर्व येथील SBI बॅकेत धक्कादायक प्रकार घडला आहे. दहिसर (पू) येथील एसबीआय बँकेत गोळीबाराची घटना घडली. हल्लेखोरांनी एका व्यक्तीच्या छातीत गोळी झाडून एटीएंमधून तब्बल २.५०लाख रुपये घेऊन पळ काढला आहे. छातीत गोळी झाडलेला व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव संदेश भुमारे (२८) असे आहे. घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी दहिसरमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.

दहिसरमध्ये बुधवारी दुपारी चार वाजच्या सुमारास ही घटना घडली. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने बंदूकधारी हल्लेखोरांनी SBI बँकेत प्रवेश केला. बँकेतील सर्व कर्मचारी आणि ग्राहकांना बंदूकीचा धाक दाखवला. यात एक संदेश भुमारे हा २८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा सध्या तपास करत आहेत. दहिसरमध्ये अनेक ठिकाणी नाकाबंद करण्यात आली असून सर्वत्र तपासणी सुरू आहे.

या घटनेवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी देखील तीव्र प्रतिक्रीय दिली आहे. ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. दहिसरमध्ये घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे. मी कालच कायद सुव्यस्थेवर अंतिम आठवडा प्रस्ताव आणला होता. आणि आज दरोडा पडला. बँकेवर अशाप्रकारचे हल्ले होत राहिले तर जगायचे कसे, ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? राज्य सरकार यासाठी जबाबदार आहे, अशी टीक दरेकरांनी केली.


हेही वाचा –  Corona Virus : मुंबईत आजपासून २ हजार कोरोना रुग्ण आढळण्याची शक्यता, आदित्य ठाकरेंचा इशारा

First Published on: December 29, 2021 7:14 PM
Exit mobile version