मुंबई गणेश विसर्जन मिरवणूक LIVE : अजानसाठी थांबला ‘लालबागचा राजा’

मुंबई गणेश विसर्जन मिरवणूक LIVE : अजानसाठी थांबला ‘लालबागचा राजा’

मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह. ढोल - ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण.

गेल्या १० दिवसांपासून मुंबईत आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच गजर होता आणि तो म्हणजे ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’! बाप्पाच्या आगत-स्वागताचा उत्साह अजूनही तितकाच असतानाच बाप्पला निरोप देण्याचा दिवसही येऊन ठेपला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. अवघी मुंबापुरी गणरायाच्या अधिवासाने आणि उत्साहाने न्हाऊन निघाली आहे.


भायखळा येथे लालबाग राजाच्या मिरवणुकीदरम्यान अनोखा योगायोग घडून आला. भायखळा मस्जिदजवळ लालबागचा राजा पोहोचला असताना अजान सुरू झाली. यावेळी अजान संपेपर्यंत राजा काही काळ थांबला आणि अजान संपल्यानंतर मार्गस्थ झाला.

मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह पाहायाला मिळतोय. ढोल- ताशा, लेझिम या पारंपारिक वाद्यांच्या साथीनं पुढच्या वर्षी लवकर या! म्हणत भक्त मिरवणुकीमध्ये दंग झाले आहेत.

 

दादर चौपाटीवर मानव संघ संस्थेची मानवी साखळी!

समुद्राला भरती असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दादर चौपाटीवर ‘मानव संघ’ या संस्थेद्वारे मानवी साखळी बनवून गणेश भक्तांना समुद्रात जाण्यापासून रोखले जात आहे.


बॉलिवुडच्या कपूर फॅमिच्या आर. के. स्डुडिओमध्येही आज गणेश विसर्जनाची धूम पाहायला मिळाली. आर. के. स्टुडिओ विकण्याची तयारी सुरू असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा आर. के. स्टुडिओमधला कपूर फॅमिलीचा शेवटचा गणेशोत्सव असण्याची शक्यता आहे.


५.४० – गणेश विसर्जन सुरू असताना पर्यावरणप्रेमींकडून दादर चौपाटीची स्वच्छता सुरू!


देवासाठी फक्त भाव हवा! त्या चौघींनी दाखवून दिलं!

घरात गणपती बसवायचा म्हटलं की त्याचे सगळे विधी, पूजा, प्रथेप्रमाणे, काटेकोर नियमानुसारच व्हायला हवे, तसे नसेल तर गणपती बसवूच नये असे अनेक संवाद आपण ऐकतो. पण मुंबईतल्या चार मुलींनी फक्त भाव असेल तर तुम्ही गणपती बसवू शकता आणि त्याला त्याच भावपूर्ण पद्धतीने निरोपही देऊ शकता हे दाखवून दिलं आहे. कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या या मुलींनी त्यांच्या रूमवर गणेशाची स्थापना केली आहे. तीही इको-फ्रेंडली पद्धतीने!


५.३० – पहिली सुतारगल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

पहिली सुतारगल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर

५.२० – कामाठीपुऱ्याचा पंचशील विघ्नहर्ता गिरगाव चौपाटीवर दाखल

कामाठीपुऱ्याचा पंचशील विघ्नहर्ता गिरगाव चौपाटीवर दाखल

४.५० – खेतवाडीचा चिंतामणी विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला

खेतवाडीचा चिंतामणी

४.२० – गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्नी रोड स्थानकाव मोठी गर्दी

गणेश विसर्जनााठी चर्नी रोड स्टेशनवर मोठी गर्दी

दुपारी ३.०० – गणेश विसर्जनाची आकडेवारी

सार्वजनिक – ७३

घरगुती – ३४४७

गौरी – १२

एकूण – ३५३२

 

कृत्रिम तलाव

सार्वजनिक – ५

घरगुती – ५४३

गौरी – २

एकूण – ५५०


खास गणेश विसर्जनासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसह मुबंईच्या चौपाट्यांवर विशेष फ्लड रेस्क्यू बोटी तैनात आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दादर चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी कशी काळजी घेतली आहे? याची ‘माय महानगर’च्या टीमला माहिती दिली आहे.


दुपारी ३.३० – दादर चौपाटी परिसरात हळूहळू गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीसाठी जमायला सुरुवात. पालिकेकडून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना

दादर चौपाटीवर गणेशभक्तांची गर्दी


या चिमुरड्यांचा उत्साह एकदा पाहा आणि मग डीजेबद्दल बोला! – Video: चिमुरड्यांची पारंपारिक विसर्जन मिरवणूक


दुपारी २.३० – मुलुंड तलावात गणेश विसर्जनाला सुरुवात

मुलुंड तलाव

चिंचपोकळीतील तेजुकायाचा गणेश श्रॉफ बिल्डिंगजवळ, गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी

चिंचपोकळीच्या तेजुकाया गणेशावर पुष्पवृष्टी

आर. के. स्टुडिओच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी लावली हजेरी! आर. के. स्टुडिओची विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यंदाचं बाप्पाचं शेवटचंच वर्ष असण्याची शक्यता आहे.


चिंचपोकळीच्या स्थानिक हनुमान उत्सव मंडळाकडून बाप्पावर पुष्पवृष्टी

चिंचपोकळीमध्ये स्थानिक हनुमान उत्सव मंडळाचा उपक्रम

तुमच्या आमच्या बाप्पाचं विसर्जन सुरू असताना बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिस, जीवरक्षक, अग्निशमन अधिकाऱ्यांच्या बाप्पांचं विसर्जन कसं होतं? कधी होतं? कुठे होतं? कोण करतं? सविस्तर वाचा – 

घरचे गणपती असतानाही ‘ते’ तैनात असतात आपल्या सुरक्षेसाठी


१२ वाजेपर्यंत मुंबईत विसर्जन झालेली आकडेवारी

सार्वजनिक मंडळ – ०२

घरगुती – ६६७

गौरी – ०१

एकूण – ६७०

 

कृत्रिम तलावात विसर्जन

सार्वजनिक – ००

घरगुती – ७२

गौरी – १

एकूण – ७२


गिरगावात शाळकरी मुलांनी घेतली गणेशभक्तांना पाणी पाजण्याची जबाबदारी!

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी भाविक गिरगाव चौपाटीवर दाखल होऊ लागले आहेत. ऑक्टोबर हीट असल्यामुळे या तहानलेल्या भाविकांना पिण्याचं पाणी देण्याची जबाबदारी काही शाळकरी मुलांनी उचलून बाप्पाच्या भक्तीचा अनोखा आदर्श ठेवलाय.


दुपारी १.२५ – दादर चौपाटीवर आतापर्यंत ९७ घरगुती आणि एका सार्वजनिक गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं आहे

दादर चौपाटीवर गणपती विसर्जन

पुण्यात डीजेचा दणदणाट होणारच? स्पिकर रेकसह मंडळ लाईनला!

उच्च न्यायालयाने बंदी घालूनही पुण्यातील गणेश मंडळ डीजेच्या दणदणाटासाठी सज्ज झाली आहेत. ही सगळी मंडळं लाईनमध्ये स्पिकर्सचे रेक घेऊनच उभी आहेत. त्यामुळे संध्याकाळी पुण्यात डीजेचा दणदणाट होणार का? यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.


पुण्यात एकीकडे डीजेचे रेक तर दुसरीकडे पारंपरिक नगाडा वादनाचा उत्साह!


१२.१० – लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, पण अजून जागेवरच, भक्तांची दर्शनासाठी मोठी राग


वाचा – मुंबईत कसं, कुठे, कधी आणि किती होणार गणेशविसर्जन!



गिरगाव चौपाटीवर बाप्पांच्या निरोपासाठी विशेष तराफ्याची सोय!

गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी तराफा

पुण्यातल्या गणेश मंडळांनी घालून दिला डीजे संस्कृतीला फाटा देणारा आदर्श! पाहा नगारा वादनाचं अप्रतिम सादरीकरण!


११.०० – चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात


१०.४० – घाटकोपर येथील विश्व अजिंक्य गणेशोत्सव मंडळ डीजे बंदीच्या विरोधात काळया फिती लावून निषेध करणार, अध्यक्ष बंड्या दळवी यांनी केलं स्पष्ट


पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर भेटीला येणार! वाचा सविस्तर!


१०.२९ – गणेश गल्लीच्या राजाची मोठी मिरवणूक, लाडक्या गणरायाच्या निरोपाला मोठ्या संख्येने भाविक हजर

गणेश गल्लीचा राजा मिरवणूक

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत बदल, वाचा सविस्तर : मुंबईच्या ५३ रस्त्यांवर No Entry!


१०.०० – गिरगाव चौपाटीवर पाणी पातळी वाढली. पालिकेकडून भरती-ओहोटीची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

गिरगाव चौपाटीवर पाणी पातळी वाढली

गोराई तलावावर विसर्जनाची तयारी

१०.०० – बाप्पाच्या विसर्जनासाठी बोरिवलीतील गोराई सज्ज. विसर्जनासाठी जरी बाप्पाचे आगमन झाले नसले तरीही मंडळाचे कार्यकर्ते मंडप बांधत आहेत. सध्या या परिसरात शांतता आहे. मात्र काही वेळातच येथे बोरिवली, कांदिवली आणि दहिसर परिसरातील बाप्पाचे विसर्जन होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काळाचौकीच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक सुरू

९.०० – लालबाग मधील प्रसिद्ध काळाचौकी महागणपती विसर्जन मिरवणुकीस देखील सुरुवात

सकाळी ९ – गिरगाव चौपाटीवर घरगुती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात. पाणी जास्त असल्यामुळे जीवरक्षकच करत आहेत विसर्जन

गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक सुरू

सकाळी ८ – गणेशगल्लीच्या राजाची मिरवणूक सुरू

सकाळी ६ – तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. सादाबादप्रमाणे यंदाही कोळी महिलांनी पारंपरिक कोळी नृत्य सादर करत लाडक्या बाप्पाच्या निरोपाची तयारी सुरू केली.

First Published on: September 23, 2018 8:56 AM
Exit mobile version