घरमुंबईगणेशगल्ली बाप्पाच्या मिरवणूकीला सुरुवात!

गणेशगल्ली बाप्पाच्या मिरवणूकीला सुरुवात!

Subscribe

ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाला निरोप दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून संपूर्ण राज्यात एकच गजर होता आणि तो म्हणजे ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’! सध्या सगळीकडे विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. सर्वचजण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याच्या तयारीला लागले आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. अवघी मुंबई गणरायाच्या उत्साहात बुडून गेली आहे.

आज सकाळी मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली असून गणेशगल्लीचा राजा मंडपातून निघाला आहे. गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया असा एकच जल्लोष होत आहे. ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक निघाली आहे.

मुंबई गणेश विसर्जन मिरवणूक LIVE : अजानसाठी थांबला ‘लालबागचा राजा’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -