घरमहाराष्ट्रVideo: चिमुरड्यांची पारंपारिक विसर्जन मिरवणुक

Video: चिमुरड्यांची पारंपारिक विसर्जन मिरवणुक

Subscribe

आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना खेड तालुक्याच्या शाळेतील विद्यार्थांनी ढोल-ताशा आणि लेझिमच्या तालावर ठेका धरला. पारंपरिक गाण्यातुन या मुलांनी बाप्पाला त्यांनी निरोप दिला.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक म्हटलं की तरुणांची हुल्लडबाजी, डीजे-डॉल्बीचा ताल या गोष्टी बहुतांशी ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, ही चौकट मोडली आहे ती वारकऱ्यांचा वारसा असणाऱ्या खेड तालुक्यातील लहानग्यांनी. खेड तालुक्यातील दावडी व होलेवाडी येथील श्री विघ्नहर मित्र मंडळ व रिद्दी सिद्धी गणेश मंडळांनी पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाची मिरवणूक काढली. लहानग्यांनी टाळ-मृदुंगांचा निनाद आणि हरिनामाचा गजर करत बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली. मिरवणुकीतील चिमुकल्यांचा लोभसवाणा वारकरी अवतार सर्वांचच लक्ष वेधून घेत होता. चिमुकल्यांच्या बोबड्या वाणीतुन बाप्पाला अभंगवाणीतुन टाळ-मृग्दांच्या नादात धुंद होऊन निरोप दिला.


वाचा : ‘डीजे’बंदी विरोधात काळ्या फिती लावून निषेध!

शाळकरी मुलांची ज्ञानमंदीरातुन मिरवणुक

आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना खेड तालुक्याच्या शाळेतील विद्यार्थांनी ढोल-ताशा आणि लेझिमच्या तालावर ठेका धरला. पारंपरिक गाण्यातुन या मुलांनी बाप्पाला त्यांनी निरोप दिला. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि लोककलांच्या अफलातून सादरीकरणाने या विसर्जन मिरवणूक सोहळ्याला चांगलीच रंगत आली होती. उत्साहात मात्र तितक्याच शांततेत सुरु झालेल्या या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वेशातील महिलांचा सहभागही लक्षणीय होता. नऊवारी साडी, डोक्‍यावर तुळशी वृंदावन कपाळी बुक्का आणि मुखात हरिनाम अशा वातावरणात ग्रामीण भागात बाप्पाची ही मिरवणुक निघाली होती.

वाचा: पुढच्या वर्षी बाप्पा येणार लवकर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -