नेपाळच्या तरुणीवर राजधानी दिल्लीत सामूहिक अत्याचार

नेपाळच्या तरुणीवर राजधानी दिल्लीत सामूहिक अत्याचार

सामूहिक अत्याचार

नेपाळवरून भावाला भेटण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर दिल्लीत सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली. या तरुणीने मुंबईत आल्यानंतर सोमवारी सायंकाळी ओशिवरा पोलीस ठाण्यात सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली असून ओशिवरा पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी गुन्हा दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती शैलेश पासलवार यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली. पीडित तरुणी ही मूळची नेपाळची राहणारी आहे. या तरुणीचा भाऊ मुंबईतील गोरेगाव पश्चिम भगतसिंग नगर येथे राहण्यास असून त्याला भेटण्यासाठी ती नेपाळ येथून दिल्ली व्हाया मुंबईकडे येण्यास निघाली होती. दरम्यान, नेपाळवरून ती बसने दिल्ली येथे रात्री उशिरा उतरली, तेथून तीने रेल्वे स्थानक गाठले. मात्र मुंबईला येणारी ट्रेन सुटल्यामुळे ती एकटीच फलाटावर बसून होती.

त्यावेळी काही युवक तिच्याकडे आले, ही जागा रात्रीच्या वेळी सुरक्षित नसल्याचे सांगून जवळच आमचा मित्र आणि त्याचे कुटुंब राहतात, असे सांगून तू त्यांच्यासोबत रात्र काढून सकाळी निघून जा, असे सांगून चौघांनी या तरुणीला एका खोलीत आणून तिच्यावर बळजबरीने सामूहिक अत्याचार केला. या घटनेची कुठेही वाच्यता केली तर जीवे मारू आणि वेश्याव्यवसाय करते म्हणून पोलिसांच्या ताब्यात देऊ, अशी धमकी या तिघांनी पीडित तरुणीला दिली. या तरुणाने या चौघांच्या ताब्यातून कशीबशी स्वतःची सुटका करून मुंबई गाठली.

मुंबईतील ओशिवरा येथे आल्यानंतर तिने तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाबाबत ओशिवऱ्यातील एका महिलेला सांगितला.या महिलेने सोमवारी सायंकाळी या पीडित तरुणीला घेऊन ओशिवरा पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस ठाण्यात दिल्लीत तिच्यावर झालेल्या सामूहिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. ओशिवरा पोलीसानी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून चार अनोळखी तरुणाविरोधात सामूहिक अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली.

हेही वाचा –

‘श्रावणीने अभ्यास करावा यासाठी पालकांनी लावले होते घराला टाळे’

मुलीची छेड काढत वडील आणि भावावर चाकू हल्ला; वडिलांचा मृत्यू

सावरकर स्वातंत्र्यवीर नव्हते; राजस्थान काँग्रेसने अभ्यासक्रमातला इतिहास बदलला

First Published on: May 14, 2019 4:15 PM
Exit mobile version