घरदेश-विदेशमुलीची छेड काढत वडील आणि भावावर चाकू हल्ला; वडिलांचा मृत्यू

मुलीची छेड काढत वडील आणि भावावर चाकू हल्ला; वडिलांचा मृत्यू

Subscribe

दारापूर भागामध्य मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींना विरोध केल्याने ध्रुव राज त्यागी (५१ वर्ष) आणि त्याच्या मुलावर आरोपींनी चाकूने हल्ला केला.

दिल्लीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. मुलीची छेडछाड करणाऱ्या विरोध करणाऱ्या वडिल आणि भावावर आरोपींनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीच्या मोतीनगर भागातील बसई दारापूर येथे ही घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयिनसह ४ आरोपींना अटक केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या दारापूर भागामध्य मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींना विरोध केल्याने ध्रुव राज त्यागी (५१ वर्ष) आणि त्याच्या मुलावर आरोपींनी चाकूने हल्ला केला. ध्रुव त्यागी त्याच्या कुटुंबियासोबत दारापूर भागामध्ये राहतात. काल रात्री ते मुलगी आणि मुलासोबत जात होते. गल्लीमध्ये उभ्या अलेल्या मुलांनी त्यांच्या मुलीची छेड काढली. याला विरोध करत असताना आरोपींनी ध्रुव आणि त्यांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ध्रुव राज त्यागी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, हे प्रकरण दोन वेगवेगळ्या समुदायाशी जोडले आहे. त्यामुळे या घटनेनंतर आसपासच्या परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ध्रुव यांच्या भावाने सांगितले की, ‘माझा भाऊ आपल्या मुलगा आणि मुलासोबत हॉस्पिटलमधून घरी येत होता. तेव्हा चार तरुणांनी त्याचा रस्ता अडवला आणि मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली. तिच्यावर आक्षेपार्ह टिपणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ध्रुव यांनी मुलीला घरी सोडून ते त्या मुलांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांनी ध्रुव आणि त्यांच्या मुलावर हल्ला केला.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -