स्टेट बँकेतर्फे उद्यापासून सगळी कर्ज स्वस्त होणार

स्टेट बँकेतर्फे उद्यापासून सगळी कर्ज स्वस्त होणार

SBI Notification 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती, ४० हजारांपेक्षा अधिक पगार, असा करा अर्ज

भारतीय स्टेट बँकेने कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयानुसार, हे दर उद्या, १० ऑक्टोबरपासूनच लागू होणार आहेत. बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे. बँकेने एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी घटवले असून या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत एसबीआयने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना फायदा मिळावा हा या मागचा उद्देश आहे.

बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दरात ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील आर्थिक वर्षापर्यंत हे दर ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्क्यांवर येऊन स्थिरावले आहे. मंदीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबर रोजी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व बँकेने रेपो दरात २५ आधार अंक घटवून ५.१५ टक्के केला होता. हे पाहता या आर्थिक वर्षातील कपातीचा आकडा १३५ पोहोचला आहे. विशेष म्हणजे ९ वर्षांत पहल्यांदाच इतका कमी रेपो दर कपातीचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

आरबीआयने चालू आर्थिक वर्षाचा विकासदर ऑगस्टमध्ये ६.९ टक्के इतका ठरवला, तो आता ६.१ टक्के इतका खाली आणला आहे. सध्याची जागतिक मंदी पाहता ६.१ टक्के वाढीचे उद्दिष्ट साधेल का, याबद्दलही बाजाराला शंका आहेत. त्या आघाडीवर अपेक्षाभंग होऊ शकतो, असे तज्ज्ञ मानतात. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीच्या सहा सदस्यांपैकी एकाने ०.४ टक्के दरकपातीचा आग्रह धरला होता. त्याबाबत समितीने अनुकूलता दर्शविली आहे. याचा अर्थ भविष्यात आणखी दरकपात होऊ शकेल.

हेही वाचा –

तुम्ही थोरात तर आम्ही जोरात – उद्धव ठाकरे

First Published on: October 9, 2019 2:52 PM
Exit mobile version