घरमहाराष्ट्रतुम्ही थोरात तर आम्ही जोरात - उद्धव ठाकरे

तुम्ही थोरात तर आम्ही जोरात – उद्धव ठाकरे

Subscribe

‘थोरात साहेब तुम्हीसुद्धा निश्चित मनाने घरी जा. कारण तुमचा नेता बँकॉकला पोहोचला आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील काळजी करु नका. घरी बसा आरामात. नाहीतरी तुमाहाला ही जनता घरी बसवणार आहे. काहीतरी उपमा द्यायलासुद्धा संदर्भ असावा लागतो. कुठे छत्रपती शिवाजी महाराज! कुठे बाजीप्रभू देशपांडे! आणि कुठे हे…!’, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. बाळासाहेब थोरात यांनी आपण काँग्रेसचे बाजीप्रभू देशपांडे आहोत, असा दावा केला होता. त्यांच्या याच दाव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुकले आहे. यावेळी त्यांनी संगमनेरचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

हेही वाचा – हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे – एकनाथ खडसे

- Advertisement -

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘नवले माझ्याकडे आले आणि आपण त्यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले. मी नवलेंना विचारले तुम्हाला माहिती आहे ना, समोर कोण आहे? ते बोलले, ते तशे असतली तर मीही जोरात आहे. ते थोरात आम्ही जोरात आहोत. होय, यावेळेला जोरातच! इकडेतिकडे बघायचे नाही. आता यांना इतिहास आठवायला लागला. बाजी प्रभू देशपांडे कोण होते माहित आहे का? कशासाठी लढले माहिती आहे का? ते स्वराज्यासाठी लढले, शिवरायांसाठी लढले. पन्हाडाच्या वेढ्यातून शिवराय तेथून निसटले आणि विशाल गडावर गेले. यावेळी ती जी मधली खिंड होती तिला आता पावन खिंड म्हणतात. बाजीप्रभू सारख्या निष्ठावान मावळ्याने स्वराज्यासाठी बलिदान दिले. बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी रक्त सांडले. तुमचे काय सांडले? अक्कल ऊतू जातेय बाकी काही सांडत नाही. समोरुन शत्रूच्या सेनेच्या लोंढेच्या लोंढे येत असताना तो वीर दोन हातामध्ये तलवार घेऊन स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्याने बाजी लावली म्हणून त्याचे नाव बाजीप्रभू. पराभव नक्की, मरण डोळ्यांसमोर दिसतोय. पण माझा राजा जोपर्यंत त्या गडावर पोहोचत नाही, तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. प्राणात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शत्रूला थोपवून धरणार म्हणजे धरणार! तसे त्याने धरले आणि मग त्या गडावरुन तोफांची आवाज आल्यानंतर माझा राजा सुरक्षित पोहोचला. आता मला देह सोडायला हरकत नाही म्हणत धारातीर्थ पडला तो बाजीप्रभू’, असे उद्धव ठाकरे म्हणाला.


हेही वाचा – आजपासून सभांचा धडाका सुरु; चार मोठ्या नेत्यांच्या सभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -