Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipकधीकधी 'लेझी पॅरेंटिंग'सुद्धा ठरू शकते मुलांसाठी फायद्याचे

कधीकधी ‘लेझी पॅरेंटिंग’सुद्धा ठरू शकते मुलांसाठी फायद्याचे

Subscribe

आजकाल अनेक जण पालकत्वाला खूप गांभीर्याने घेतात. मूल जन्माला येताच आणि 6 महिन्यांचे झाल्यावर त्याच्या खाण्यापासून शिक्षणापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेऊ लागतात. मग मुलं जशी मोठी होतात, त्यांना प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी शिकवा. त्यांनतर त्यांच्या शालेय जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे सुरू होते. पण तुम्हाला माहीत आहे का की, कधी कधी काहीही न करणे मुलांसाठी फायद्याचे ठरू शकते. ज्याला ‘लेझी पॅरेंटिंग’ अर्थात ‘आळशी पालकत्व’ असे म्हणतात. यासाठी आळशी पालकत्व म्हणजे नेमकं काय? त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश येतो, हे आपण पाहुयात.

80,000+ Family Discussion Pictures

- Advertisement -

आळशी पालकत्व म्हणजे काय?

आळशी पालकत्वामध्ये, पालक हस्तक्षेप करत नाहीत किंवा मुलाला काहीही करण्यापासून रोखत नाहीत. उलट, त्यांना सर्व कामे स्वत: करू दिली जातात. यामुळे मुले चुका करतात आणि स्वतःच शिकतात. याने मुले स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम बनतात.

- Advertisement -

37,400+ Indian Parents Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock | Indian parents with newborn, Old indian parents, Indian parents teaching kids

आळशी पालकत्वाचे फायदे –

  • आळशी पालकत्वाचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना आत्मविश्वास मिळतो.
  • मुलांच्या दैनंदिन कामात ढवळाढवळ न केल्याने आणि त्यांना स्वतःहून गोष्टी करण्याची परवानगी दिल्याने, त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
  • आळशी पालकत्वामध्ये, पालक मुलांना चुका करण्याचे स्वातंत्र्य देतात. फक्त मुलं कोणती मोठी चूक तर करणार नाही ना, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.
  • अनेक वेळा मुले कामे शिकताना चुकतात, स्वतःला हानी देखील पोहचवतात. मात्र याने मुले स्वावलंबी बनण्यास मदत मिळते.
  • लेझी पॅरेंटिंगमुळे मुलांना पालकांच्या सूचना घेण्याचे आणि त्या फॉलो करण्याचे दडपण येत नाही.

 


हेही वाचा ; मुलांना शिक्षणाबरोबरच शिकवाव्यात ‘या’ 5 गोष्टी

- Advertisment -

Manini