भारत बंद असताना मुंबईत ‘बेस्ट’ ची वाहतूक सुरळीत

भारत बंद असताना मुंबईत ‘बेस्ट’ ची वाहतूक सुरळीत

बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सल्लागार नेमणार

केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी आज शेतकरी संघटनांनी व राजकीय पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र मुंबईत या भारत बंदला अनेक राजकीय पक्षांची म्हणजे सत्ताधारी महाविकास आघाडीने पाठींबा दिलेला असतानाही रिक्षा, टॅक्सी यांच्यासह बेस्टची वाहतुकही सुरळीत होती.

सकाळी ८ वाजताच्या सुमारास बेस्टच्या ३४३५ बस गाड्यांपैकी २९१३ बस (८४.८०%) रस्त्यावर धावत होत्या. तर ३३६७ वाहकांपैकी २६६७ वाहक (७९.२१%), ३११८ बस चालकांपैकी २३४९ चालक (७५.३४%), २१२ निरीक्षकांपैकी १५३ ( ७२.१७%), २०९ बस स्टार्टर पैकी १०७ स्टार्टर (आणि एसटी महामंडळाच्या १ हजार बस गाड्यांपैकी ३२६ बसगाड्या (३२.६०%) कार्यरत असल्याचे बेस्ट प्रशासनातर्फ़े कळविण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेस्टच्या ४५२९ बसगाड्यांपैकी ४४८६ बसगाड्या रस्त्यावर धावत होत्या.तसेच यावेळी ४२११ बस वाहकांपैकी ३५५५बस वाहक आणि ३६९२ बस चालकांपैकी ३२७७ बस चालक सेवेत होते, असे बेस्ट प्रशासनाने कळवले आहे. एकूणच मुंबईत बेस्टची सेवा ही नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावत होती,असे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.

बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी, भारत बंद असला तरी अत्यावश्यक सेवा म्हणून बेस्ट बसगाड्यांची सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत असेल, असे सोमवारीच सांगितले होते. सुदैवाने मुंबईत कुठेही अनुचित घटना घडली नाही व त्यामुळे बेस्टचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्तसायंकाळी उशिरापर्यंत हाती आलेले नव्हते.


हेही वाचा – महापालिका मुख्यालयासमोरील खड्ड्यातूनच अधिकाऱ्यांचा प्रवास

First Published on: December 8, 2020 7:41 PM
Exit mobile version