‘भाऊ भावाला गोळी घालतो, त्याला म्हणतात गृहकलह!’

‘भाऊ भावाला गोळी घालतो, त्याला म्हणतात गृहकलह!’

अजित पवार यांनी काल तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पवार कुटुंबीयांमध्ये गृहकलह पेटला असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु झाली होता. या चर्चेला आज अजित पवार यांनी स्वतः पत्रकार परिषदेत छेद दिला. “भाऊ भावाला गोळी घालतो, त्याला गृहकलह म्हणतात. राज्यात अशा घटना घडलेल्या आहेत. आम्ही त्यावर कधीही भाष्य करत नाहीत. मात्र पवार कुटुंबात कोणताही कलह नाही. पवार साहेबांनी पक्ष आणि पवार कुटुंबीय आपला कुटुंब प्रमुख मानतात. त्यामुळे पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नाही”, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.


हेही वाचा – राजीनाम्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांना झाले अश्रू अनावर!

अजित पवार यांच्या राजीनाम्यामागे पवार कुटुंबातील युवा नेतृत्व पार्थ पवार आणि रोहित पवार यांची उमेदवारी, अजित पवारांचे पक्षात कमी होत असेलेले वजन अशी कारणे असल्याची चर्चा केली जात होती. तसेच शरद पवार हे एकट्यानेच विधानसभेचा किल्ला लढवत आहेत, असेही चित्र निर्माण होत होते. त्यातूनच पक्षाला किंवा शरद पवारांना विश्वासात न घेता, अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे गृहकलहाच्या चर्चांना पेव फुटले होते. मात्र आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार आणि शरद पवार यांचे नाव राज्य सहकारी बँके घोटाळ्यात घेतल्यानंतर दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ईडीने नोटीस न देताही शरद पवारांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी व्यथित होऊन राजीनामा दिला होता. यावर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, याचिकाकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर सरकारतर्फे आर्थिक गुन्हे विभागाने राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाला नसून यात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगितले होते. मात्र हायकोर्टाने निर्देश केल्यानंतर आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला होता. मात्र यावेळी शरद पवार यांचे नाव कुठेही घेण्यात आले नव्हते. मात्र ईडीने शरद पवार यांचा संबंध का जोडला? यावर आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला.

तर दादा हिमालयात गेले असते

अजित पवार किती मृदू स्वभावाचे नेते आहेत. हे आम्हाला सुरुवातीपासून माहीत आहेच. आज राज्यातील जनतेनेही त्यांचा हा स्वभाव पाहीला. दादांनी भावनाविवश होऊन हा निर्णय घेतला. अजितदादांनी एखादी गोष्ट ठरवली की ती ते करतातच. राजीनामा देऊन ते हिमालयात जाऊन बसायलाही कमी करणार नाहीत, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.


शरद पवारांचं नाव गोवल्यामुळे व्यथित होऊन राजीनामा दिला – अजित पवार
First Published on: September 28, 2019 5:12 PM
Exit mobile version