सार्वजनिक रुग्णालयांच्या स्पर्धेत ‘केईएम’ देशात अव्वल

सार्वजनिक रुग्णालयांच्या स्पर्धेत ‘केईएम’ देशात अव्वल

केईएम हॉस्पिटल

देशातील उत्कृष्ट रुग्णालयांच्या यादीत परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयाची नोंद करण्यात आली आहे. चकचकीत इमारती, व्यक्तिगत रुग्णसेवा, अत्याधुनिक उपकरणांच्या स्पर्धेत आजही खासगी हॉस्पिटल्सची चर्चा असते. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाने ही प्रथा मोडित काढली आहे. भारतातील उत्कृष्ट सरकारी रुग्णालयांच्या यादीत केईएम तिसऱ्या क्रमांकांवर असल्याची नोंद ‘ द वीक हंसा’ रिसर्च सव्र्हे २०१८ कडून घोषित करण्यात आले आहे. या माहितीनुसार, पहिल्या दोन क्रमांकावर देखील सरकारी रुग्णालये आहेत पण त्या रुग्णालयांना केंद्रांकडून अनुदान मिळतं. शिवाय हे अनुदान पालिका किंवा राज्य सरकारच्या अनुदानापेक्षा अधिक असतं. केईएम मात्र पालिका आणि राज्य सरकारच्या निधीवर चालत असूनही उत्कृष्ट सरकारी रुग्णालयांच्या पहिल्या पाचमध्ये आहे. सरकारी रुग्णालयांसोबत इतर येणारी खासगी रुग्णालयांमध्ये कार्पोरेटर असली तरीही अशांमध्ये निव्वळ रुग्णालयं आहेत. मात्र, केईएम रुग्णालय रुग्णालयासोबतच वैद्यकीय महाविद्यालय असून इथे रुग्णसेवेचे शिक्षण दिले जात असल्याचं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं.

केईएम हॉस्पिटलला देशातील उत्कृष्ट रुग्णालयांच्या यादीत पहिला क्रमांक मिळणं, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. हॉस्पिटलधील फॅकल्टी आणि सर्वांच्या कामाचे हे चीज आहे. सार्वजनिक रुग्णसेवेतील सरकारी हॉस्पिटल म्हणून केईएमचे नाव उत्कृष्टतेच्या यादीत राहणं फार महत्वाचे आहे.– डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता , केईएम रुग्णालय

केईएम रुग्णालयाची स्थापना १९२६ वर्षी झाली. सार्वनिक रुग्णालयामधील केईएमचे नियंत्रण मुंबई महानगरपलिका करत आहे. या रुग्णालयात १८०० खाटा आहेत. ३९० फिजिशयन डॉक्टर असून ५५० निवासी डॉक्टर आहेत. या रुग्णालयात १.८ मिलियन बाह्यरुग्ण तर अंतःरुग्णलयामध्ये ७८ हजार रुग्णांची काळजी घेण्यात येते. रुग्णालयाला लागूनच सेठ जीएस वैद्यकीय महाविद्यालय आहे.

First Published on: November 19, 2018 9:38 PM
Exit mobile version