Lata Mangeshkar: १३ व्या वर्षी गायल पहिलं गाणं, ८० वर्षांचं संगीतमय पर्व

Lata Mangeshkar: १३ व्या वर्षी गायल पहिलं गाणं, ८० वर्षांचं संगीतमय पर्व

Lata Mangeshkar: १३ व्या वर्षी गायल पहिलं गाणं, ८० वर्षांचं संगीतमय पर्व

सुप्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज वयाच्या 92 व्या वर्षी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 8 जानेवारी रोजी कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने देशाची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. वयाच्या १३ व्या वर्षी गाण्याचा सुरु झालेला प्रवास तब्बल ८० वर्ष अवितरत सुरू राहिला. वयाच्या १३ ते ९३ वर्षांच्या प्रवास सर्वांना मंत्रमुग्ध करुन गेला.

लता बाईंचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदौर येथे झाला. मराठी रंग भूमीवरील प्रसिद्ध गायकनट मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या. वडीलांकडूनच त्यांना गायनाचे बाळकडू मिळाले. भेंडीबाजारवाले खाँसाहेब अमानअळी आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ यांच्याकडे लता बाईंनी शास्त्रीय गाण्याचे धडे घेतले. लता मंगेशकर वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते, तर ‘पहिली मंगळागौर’ (1942) या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनयही केला होता. 1946 साली वसंत जोगळेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी आप की सेवा में या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी गीत गायले. लता मंगेशकर यांनी 22 भाषांमधील, 1800 पेक्षाही अधिक चित्रपटांमधून 25 ते 30 हजार गाणी गायली आहेत. सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ असान त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.

Lata Mangeshkar:…म्हणून लता मंगेशकरांनी किशोर कुमार यांच्यासोबत रेकॉर्डिंगला दिला होता नकार

लहान वयात वडीलांच्या मायेचे छत्र हरपलेल्या लता दीदीं तीन भावंडे आणि आईची जबाबदारी सांभाळली. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे लहानपणी पुरेसे शिक्षण घेता आले नाही मात्र त्यांनी आपल्या अलौकीक कौशल्यातून न्यूयॉर्क विद्यालयासह सहा विश्वविद्यालयाच्या पदव्या संपन्न केल्या. लता दीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे रंगभूमीवरील प्रसिद्ध गायकनट होते. वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत लता दीदींनी पहिल्यांदा नाटकातील गाणे गाण्यास सुरुवात केली. १३ वर्षी पहिले गाणे गायल्यानंतर १४व्या वर्षी लता दीदींनी एका नाटकातून अभिनय करण्यासही सुरुवात केली होती. मात्र त्यांच्या संगीताच्या ओढीने त्यांना अभिनयात फार काळ टिकू दिले नाहीत.

 Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनाने सिनेसृष्टी शोकाकुल, सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

सहा दशकात लता बाईंनी एकूण २२ भाषांमध्ये तब्बल ५० हजारांहून अधिक गाणी लता बाईंनी गायली. मराठी तसेच बॉलिवूडमधील त्यांची गाणी आजही नव्या पिढीच्या तोंडी ऐकायला मिळतात. जगात सर्वात जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून लता बाईंचा गौरव करण्याच आला आहे. गीनीज बुक ऑफ वर्ल्ड केकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे. लता बाईंची हजारो गाणी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

Lata Mangeshkar Top 10 Song: सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…लतादीदींची १० अविस्मरणीय गाणी

सरकारने लता मंगेशकर यांना १९८७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले, तर २००१ साली त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांना तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना ‘लिजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा पुरस्कारही प्राप्त आहे. सर्वोत्कृष्ठ गायिका म्हणून लता मंगेशकर यांना चार फिल्मफेर, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त आहे. १९८४ मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या सन्मानार्थ पुरस्कार जाहीर केला, तर महाराष्ट्र शासनाने १९९२ मध्ये संगीत क्षेत्रातील प्रतिभावानांना लता मंगेशकर पुरस्काराने जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

१३व्या गायलेल्या पहिल्या गाण्याचा प्रवास लता दीदींनी वयाच्या ९३व्या वर्षी संपवला. २०२१मध्ये लता दीदींचे शेवटचे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले.


हेही वाचा – Lata Mangeshkar: …म्हणून लतादीदींनी लग्न नाही केले

First Published on: February 6, 2022 6:06 PM
Exit mobile version