घरताज्या घडामोडीLata Mangeshkar : लतादीदींच्या निधनाने सिनेसृष्टी शोकाकुल, सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनाने सिनेसृष्टी शोकाकुल, सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सिनेमाक्षेत्रातील दिग्गजांनी ते नव्या पिढीत गायक गायिकांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. लता दीदींच्या निधनाने संगीतातला ध्रुव तारा हरपला. संगीत क्षेत्र तसेच सिनेक्षेत्रात कधीच भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

तब्बल सहा दशके गायनाला आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची वयाच्या ९३व्या वर्षी प्राणज्योत मालवली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सिनेमाक्षेत्रातील दिग्गजांनी ते नव्या पिढीत गायक गायिकांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. लता दीदींच्या निधनाने संगीतातला ध्रुव तारा हरपला. संगीत क्षेत्र तसेच सिनेक्षेत्रात कधीच भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. सेलिब्रेटींनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्यांना ऐकत आम्ही लहानाचे मोठे झाले आहोत. त्यांच्या अनेक आठवणी मनात घोळत आहेत. १९८२ साली त्यांच्या कार्यक्रमात ‘तरुण आहे रात्र अजून’ हे गाणे गाऊन घेतले होते. दीदींच्या कार्यक्रमात मला गायला मिळणार हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते. तुझ्या यशाची ही पायरी समज असे लता दीदी मला म्हणाल्या होत्या. दीदींचा आश्वासक, खंबीर आधार मला मिळाला. मी खरंच भाग्यवान समजते सुरूवातीपासून त्यांनी गरुड भरारीचे बळ त्यांनी मला दिले. मला पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा मी त्यांच्या पाया पडले तेव्हा त्यांनी मला आईच्या मायेने माझ्या पाठीवर हात फिरवून मला जवळ घेऊन मला शुभेच्छा दिल्या. – पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, प्रसिद्ध गायिका

- Advertisement -

लता दीदींच्या निधनाची बातमी ऐकून पोटात धस्स झाले. त्यांच्या भेटी माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. त्या आज नाहीत त्यांची गाणी अजरामर आहेत. त्यांच्या गाण्याची रेंज. त्यांचा आवाज मधाळ होता. तेवढाच अग्रेसीव्ह होता. त्याच्या आवाजाचे वर्णनच करता येणार नाही. त्या  फार सहजपणे गाणी गायच्या. आयुष्यभर ज्यांनी आपल्या गाण्याने प्रेक्षकांना आनंद दिला त्या लता दीदींना त्यांच्या शेवटच्या दिवसात इतक्या यातना सहन कराव्या लागल्या. हा त्रास व्हायला नको होता. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो  – उत्तरा केळकर, ज्येष्ठ गायिका 

- Advertisement -

लता मंगेशकर गेल्या.” ही बातमी कानावर आली आणि पहिलं वाक्य जे मनात आलं ते म्हणजे – आनंद मरते नहीं. माणूस गेला असं आपण कधी म्हणतो? त्या माणसाचा श्वास बंद झाला की. परंतु इतक्या असंख्य गाण्यांमधून आपल्या स्वर्गीय सुरामधून लताबाई त्यांचा श्वासच तर सोडून गेल्या आहेत – कौशल इनामदार, संगीतकार 

ज्या अनलौकिंक स्वरांची पूजा मी आणि माझ्यासारखे असंख्य गायक करत आले आहेत ते स्वर आज आपल्यातून शरिर रुपातून निघून गेला आहे. जोवर हे स्वर आहेत तो वर लता दीदी आपल्यात आहेत. मला फार जवळून त्यांचा सहवास आणि आशिर्वाद मला लाभले हे मी माझ्या जन्माचे सार्थक मानते – सावनी रविंद्र, गायिका

अभिनेते, निर्माते आदेश बांदेकर यांनी लता मंगेशकर आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मेरी आवाज ही पहले हैं, गर याद रहे… आणि असा आवाज कसा विसरता येईल!
लता मंगेशकर यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे, भावपूर्ण श्रद्धांजली – अक्षय कुमार, अभिनेता

आम्हाला तुमची आठवण येईल. तुमचा आवाज कायम आमच्यासोबत राहिल – सलमान खान, अभिनेता

लता दीदींच्या जाण्याने भारतासाठी हा दु:खाचा दिवस होता. त्यांच्या आवाजाने त्यांनी अनेक गाणी अजरामर केली. त्यांचे गाणे कायम आमच्या ह्रदयात जिवंत राहिल – अनुष्का शर्मा,अभिनेत्री

लता मंगेशकर तुमचे संगीत,व्यक्तीमत्त्व,नम्रता पुढच्या अनेक पिढ्या आमच्या सोबत राहिल – संजय दत्त, अभिनेता

संगीत विश्वातील दैवी सूर हरपला!
लता दीदींना भावपूर्ण आदरांजली – अश्विनी भावे , अभिनेत्री

लता दीदींच्या जाण्याने फार वैयक्तीक नुकसान झाले. त्यांच्या जाण्याने अतुलनीय नुकसान झाले आहे. त्या आपल्यात नाहीत हे मानायला मन अजून तयार नाही. लाखे लोकांना हजारो गाण्यांच्या माध्यमातून अनेक दशके अनेक आठवणी दिल्याबद्दल लता दीदी तुमचे आम्ही सदैव ऋणी आहोत – महेश काळे, शास्त्रीय गायक

देवदूताच्या आवाजाने ज्यांनी सर्वांना आपल्या प्रेमात पाडले आणि आता तेच प्रेम पसवण्यासाठी त्या स्वर्गात गेल्या आहेत. तुमच्या आठवणी कायम आमच्या सोबत राहतील. आमच्या अंत:करणातून तुम्ही कधीही जाणार नाहीत पण तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरली जाणार नाही. तुमच्या आत्म्यास शांती लाभो – माधुरी दीक्षित, अभिनेत्री

“भारतरत्न लता मंगेशकर”
साक्षात सरस्वती देवी!
तुम्ही अमर आहात दीदी!
तुमचे अलौकिक आणि पवित्र सूर आयुष्यभर आम्हाला सर्व प्रसंगात सोबत करतील.
तुम्हाला आणि तुमच्यातल्या कलेला मनापासून नमस्कार…ओम शांती! – सुबोध भावे, अभिनेता

दिदि, तुमचा सच्चा-शुद्ध-सात्विक आणि अलौकिक सूर कायम सोबत आहे… तुम्ही कुठेही गेलेला नाही. तुम्ही रोज-सतत-सदासर्वकाळ आमच्या अवतीभवती आहात ! – किरण माने, अभिनेते

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही लता दीदींना श्रद्धांजली वाहिली

लतादीदींच्या निधनानंतर ए.आर.रहमान झाला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर लता दीदींना श्रद्धांजली वाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARR (@arrahman)


हेही वाचा –   Lata Mangeshkar: दैवी सुरांनी भरलेले युग संपलं! पाहा लता दीदींचे काही दुर्मिळ…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -