पबजी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन भावाने मोठ्या भावाचा केला खून

पबजी खेळण्यास मनाई केल्याने अल्पवयीन भावाने मोठ्या भावाचा केला खून

संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा

आईच्या मोबाईलवर पबजी गेम खेळण्यास मनाई केल्याने १५ वर्षीय अल्पवयीन भावाने आपल्या १९ वर्षीय मोठ्या भावाच्या पोटात कैची खोपसुन हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मोहम्मद हुसैन मोहम्मद अच्छे शाह असे मृत युवकाचे नाव असून हत्या करणाऱ्या लहान भावाला शांतीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौहान कॉलनी, मनपा शाळा क्रमांक ७० नजीकच्या चाळीत हे कुटुंबिय राहतात. शनिवारी दुपारच्या सुमारास घरात असलेला १५ वर्षीय मोहम्मद फहाद याने आपल्या आईचा मोबाईल घेऊन त्यावर ऑनलाईन पबजी गेम खेळण्यास सुरवात केली. त्यावेळी त्याचा मोठा भाऊ मोहम्मद हुसैनने त्याला मोबाईलवर गेम खेळण्यास मनाई केला. हुसैनने त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून घेतला. या गोष्टीचा राग मनात ठेऊन मोहम्मद फहादने त्याच्यासोबत वाद घातला. दोघांच्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी फहादने घरातील कैची घेऊन आपल्या मोठ्या भावाच्या छातीवर सपासप वार केले. त्यामुळे मोहम्मद हुसैन प्रचंड जखमी झाला. हुसैनला तातडीने उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घेषित केले. या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा या पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी फवादला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – अफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी

First Published on: June 29, 2019 7:52 PM
Exit mobile version