घरदेश-विदेशअफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी

अफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी

Subscribe

अफगाणिस्तान-पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये स्टेडियम बाहेर प्रचंड हाणामारी झाली. बलुचिस्तान प्रांतासाठी या चाहत्यांमध्ये हाणामारी झाल्याची बाब समोर आली आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असणाऱ्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये स्टेडियम बाहेर तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीचा एक व्हिडिओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. यासोबतच हाणामारीचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. यामध्ये दोन्ही चाहत्यांमध्ये प्रचंड हाणामारी सुरु असल्याचे दिसत आहे. हा वाद स्टेडियमच्या वरुन हवेत गेलेल्या विमानावरुन झाला आहे. कारण या विमानातून ‘बलुचिस्तानला न्याय द्या’, अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – भारत-पाकिस्तान फाळणीसारखी चूक आम्ही करणार नाहीत – अमित शहा

‘ते’ विमान अनधिकृतपणे स्टेडियमवरुन गेले

बलुचिस्तान प्रांत हा पाकिस्तानात आहे. तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवरील प्रांत आहे. या प्रांतावरुन दोन्ही देशांमध्ये बरेच वाद झाले आहेत. शनिवारी इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान एक विमान स्टेडियमच्या वरुन गेले. हे विमान अनधिकृतपणे स्टेडियमवरुन गेले. या विमानातून ‘बलुचिस्तानला न्याय द्या’, असा संदेश हवेत लिहिला होता. या संदेशामुळे दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या संवेदनशील विषयाला उकळणाऱ्या विमानाचा तपास लीड्स एअर ट्राफिक विभाग करत आहे. हे विमान अनधिकृतपणे स्टेडियमवरुन गेल्याची माहिती या विभागाने दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -