डायबिटीस रुग्णांसाठी ‘न्यू होप’

डायबिटीस रुग्णांसाठी ‘न्यू होप’

गुड होप पुस्तकाचे प्रकाशन

राज्यासह मुंबईत वाढलेल्या लठ्ठपणाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत आहेत. याचपार्श्वभूमीवर, लठ्ठपणाबाबत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे स्थुलता नियंत्रण अभियान राबवलं जात आहे. या अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून लातूरमधील डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच लठ्ठपणा अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून प्रचलित झालेल्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘डायबिटीस रिव्हर्सल : न्यू होप’ या पुस्तकाचे रविवारी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात प्रकाशन पार पडले. आरोग्यनिगा सेवेमध्ये कार्यरत असेलेल्या ‘असोशिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल’ (अडोर) या विश्वस्त संस्थेने रविवारी या व्याख्यानाचे आणि पुस्तक प्रकाशनाचे आयोजन केले होते. ‘ विनासायास वजनघट आणि मधुमेहाची हद्दपारी’ (एफर्टलेस वेट लॉस अँड डायबिटीस रिव्हर्सल) या विषयावरील हिंदी भाषेतील व्याख्यानाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

“भारत देश आपल्याला लट्ठपणा आणि मधुमेहमुक्त करायचा आहे आणि त्यासाठी मी आहारपद्धती विकसित केली आहे. स्वतःचे स्वतःवर नियंत्रण असेल, तर हे साध्य होणार आहे. तुमच्या मित्रांचे प्रत्यक्ष अनुभव आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही पद्धती अवलंबा. दोनवेळा जेवण्याची मी सांगत असलेली पद्धत ही आपल्या प्राचीन काळापासून चालत आली आहे. जो एकवेळा जेवतो तो योगी, जो दोनदा जेवतो तो भोगी आणि तीनदा जेवतो तो रोगी, असे आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे, त्यानुसारच, दोनवेळा जेवण्याची ही पद्धती योग्य आहे. इन्सुलिन हे संप्रेरक आपल्याला लट्ठ बनवते आणि त्यासाठी कर्बोदके असेलेले पदार्थ कारणीभूत ठरतात. त्यातून लट्ठपणाबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मेंदूतील रक्तस्त्राव हे घातक रोग उद्भवतात. इन्सुलिनची रक्तातील पातळी कमी झाल्याने सर्व घातक रोगांचा प्रतिबंध होतो”- डॉ. जगन्नाथ दीक्षित, ब्रँड अॅम्बेसेडर 

 

First Published on: November 25, 2018 7:35 PM
Exit mobile version