यंदा मुंबईत शुभमंगल सावधान जोरात; सव्वादोन लाख जोडपी अडकणार विवाह बंधनात

यंदा मुंबईत शुभमंगल सावधान जोरात; सव्वादोन लाख जोडपी अडकणार विवाह बंधनात

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. बाजारपेठांसह मोठ मोठे व्यवसाय सुद्धा डबघाईला आले होते. पण आता कोरोच्या या स्थितीतून औद्योगिक क्षेत्रांसह सार्वच जण बाहेर पडले आहेत. अशातच विवाहाच्या मुहूर्तांमुळे लग्नसराईचा सुद्धा उत्साह वाढला आहे.

यावर्षी विवाहाचे तब्बल १५० मुहूर्त आहेत. त्यापैकी २० नोव्हेंबरच्या दिवशी सर्वाधिक विवाह होणार असल्याचे सांगिलते आहे. अशातच मुंबईमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरदरम्यान सव्वा दोन लाख विवाह होणार आहेत. यामुळे बाजारपेठा सुद्धा गजबजलया आहेत. लग्नसराईमुळे मुंबईतल्या बाजारपेठांमध्येही खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.

साधारणतः प्रतिवर्षी दिवाळी नंतर तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार हे मुहूर्त नोव्हेंबर – डिसेंबर आणि त्यानंतर १४ जानेवारी ते मे महिन्यापर्यंत असतात. प्रतिवर्षी सरासरी ८२ ते ८५ लग्नाचे मुहूर्त असतात. त्यापैकी प्रत्येक मुहूर्तावर संपूर्ण देशभरात साधारणपणे २५ हजार विवाह होतात. पण या वर्षी तब्बल १५० विवाहाचे मुहूर्त असून संपूर्ण देशभरात विवाह सोहळ्यांचा आकडा हा ३२ लाखांच्या घरात गेला आहे. तर त्यापैकी केवळ मुंबई मध्येच सव्वा दोन लाख लग्न होणार आहेत. त्यामुळेच दिवाळी नंतरही बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.

नोव्हेंबर महिन्यात लग्न सोहळ्यांची सुरुवात रविवार २० नोव्हेंबर पासून होत आहे. यंदाचे वर्षी लग्न समारंभासाठी कोण्याही प्रकारचे कोरोनाचे निर्बध नसल्याने सर्वत्रच मोठया प्रमाणावर विवाह सोहळ्याचे धुमधडाक्यात नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे देशभरातच या माध्यमातून ३.७५ लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. तर मुंबईमध्ये ४५ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाला बळ येणार आहे. असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी सांगितले.

त्याचसोबतच यावर्षी विवाह सोहळे जोमाने होणार असून बँक्वेट हॉलसह इतर अनेक हॉलच्या मागणीत मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. त्याचबरोबर बँक्वेट हॉलच्या ६८ टक्के तर कॅटरिंग सेवांच्या मागणीत ५७ टक्के एवढी वाढ झाली आहे. ही सर्वाधिक वाढ देशाची आर्थिक राजधानी मुंबईत झाली आहे. तर मुंबई पाठोपाठ हैद्राबाद आणि दिल्लीचा क्रमांक लागतो असे जस्ट डायलने सर्वेक्षणात म्हटले आहे.

सोने बाजाराला झळाळी
अनेक जणांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. असे असले तरीही सोने खरेदीत आणि बाजारातील गर्दीद ४३ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. दागिने खरेदीच्या मागणीत पहिल्या स्थानावर मुंबई आहे. मुंबई सोन्याचा हब असल्याने मुंबई मधून अनेक किरकोळ व्यापारी सोने खरेदी करणारे मुंबई सोबतच नाशिक, अहमदनगर, जवळगाव आणि कोकणातील विक्रेतेसुद्धा झवेरी बाजारात येत असलयाचे तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितले.


हे ही वाचा – जलिकट्टू, बैलगाडा शर्यतीवर लवकरच सुप्रीम कोर्टात होणार महत्त्वाची सुनावणी

First Published on: November 19, 2022 7:47 PM
Exit mobile version