राज ठाकरेंनी घेतली ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरेंची भेट!

राज ठाकरेंनी घेतली ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरेंची भेट!

राज ठाकरेंनी घेतली ज्येष्ठ बंधू जयदेव ठाकरेंची भेट!

शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट चांगलीच चर्चेचा विषय ठरली. राज ठाकरे मातोश्रीवर गेले, अशी प्राथमिक माहिती मिळताच विरोधकांचे धाबे दणाणले. अनेकांच्या भूवया उंचवल्या. मात्र, अवघ्या काही क्षणात माहिती समोर आली की, राज ठाकरे आपले चिरंजीव अमित ठाकरे यांची लग्नपत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले. सोशल मीडियावर राज आणि उद्धव यांच्या भेटीचे प्रचंड फोटो व्हायरल झाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधु जयदेव ठाकरे यांची देखील भेट घेतली. या भेटीविषयी फार काही चर्चा झाली नाही. राज ठाकरे यांनी जयदेव ठाकरे यांना लग्नपत्रिका देऊन विवाहाचे निमंत्रण दिले.

हेही वाचा – राज ठाकरे मातोश्रीवर

निमंत्रण देण्यात राज ठाकरे व्यस्त

येत्या २७ जानेवारीला अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह होणार आहे. त्यामुळे सध्या राज ठाकरे विविध क्षेत्रातील मान्यवरांना लग्नपत्रिका देऊन विवाहाचे निमंत्रण देण्यात व्यस्त आहेत. शनिवारी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना लग्नपत्रिका देऊन विवाहाचे निमंत्रण दिले. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधु जयदेव ठाकरे यांच्या घरी गेले. तिथे त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांनाही विवाह सोहळ्यास येण्याचे निमंत्रण दिले. ज्येष्ठ बंधु जयदेव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांचे एक वेगळे असे नाते आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा यांना लग्नपत्रिका देऊन लग्नाचे निमंत्रण दिले होते. यावेळी राज यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील निमंत्रण देण्यासाठी गेल्या होत्या.

हेही वाचा – राज ठाकरेच आमचा खरा राजा – महेश मांजरेकर

अमितची होणारी पत्नी आहे फॅशन डिझायनर

अमित ठाकरे यांचा विवाह फॅशन डिझायनर मिताली बोरुडे यांच्यासोबत होणार आहे. ११ डिसेंबर २०१८ रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. आता २७ जानेवारीला ते विवाहबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील लोअर परळच्या ‘सेंट रेजिस’मध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतले आहे. प्रसिद्ध बेरिएटेरिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची ती कन्या आहे.

हेही वाचा – मोदींची ती मुलाखत ‘मॅनेज’; राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका

First Published on: January 6, 2019 2:29 PM
Exit mobile version