घरमनोरंजनराज ठाकरेच आमचा खरा राजा - महेश मांजरेकर

राज ठाकरेच आमचा खरा राजा – महेश मांजरेकर

Subscribe

खरतर मला खळखट्याक करायची इच्छा नव्हती. राज ठाकरे आमचा खरा राजा आहे. तोच आमच्यासाठी खऱ्या अर्थाने लढतो, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले आहेत.

महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट उद्या म्हणजेच ४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. परंतु, या चित्रपटाला मुंबई-पुण्याच्या सिंगल स्क्रिन थिएटर मालकांनी स्क्रिनिंग देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेले दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्रिनिंग मिळत नाही. ही एक लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे मराठी माणसाला महाराष्ट्रीन असल्याची लाज वाटते असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले आहेत. आता मराठी प्रेक्षकांनी असे म्हटले तरच सराकारचे डोळे उघडतील, असे देखील मांजरेकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरेच आमचा खरा राजा असल्याचे मांजरेकर यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा – मोदींची ती मुलाखत ‘मॅनेज’; राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका

नेमकं काय म्हणाले मांजरेकर?

‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाला स्क्रिनिंग न मिळण्यावर तुम्ही राज ठाकरेंकडे जाणार का? असा प्रश्न विचारल्यावर मांजरेकर म्हणाले की, खरतर मला खळखट्याक करायची इच्छा नव्हती. राज ठाकरे आमचा खरा राजा आहे. तोच आमच्यासाठी खर्या अर्थाने लढतो, असे महेश मांजरेकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर या विषयी आपण महाराष्ट्राचे सासंस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या विषयी चर्चा केल्या असल्याचेही मांजरेकर यांनी सांगितले. या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मॅसेज केल्याचे मांजरेकरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

‘भाई : व्यक्ती की वल्ली’ चित्रपट अडचणीत

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.लं देशपांडे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट सध्या अडचणीत आला आहे. हा चित्रपट उद्याच म्हणजे शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. परंतु, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाच्या अडचणी वाढल्या आहेत. मराठी चित्रपटांना मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो. परंतु, पुण्याच्या आणि मुंबईच्या सिंगल स्किन थिएटर मालकांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाई चित्रपट मोठ्या अडचणीत सापडला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘सिम्बा’ चित्रपट गाजताना दिसत आहे. त्यामुळे सिंगल स्क्रिनिंग असलेल्या थिएटर मालकांनी ‘सिम्बा’च्या एवजी दुसऱ्या चित्रपटाचे शो लावण्यास नकार दिला आहे. वितरकांच्या दबावामुळे मालकांनी ‘भाई’ चित्रपटाला नकार दिल्याचे म्हटले जात आहे.


हेही वाचा – ‘राज ठाकरेंनी आता चला हवा येऊ द्या पाहावं’!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -