घरमहाराष्ट्रमोदींची ती मुलाखत 'मॅनेज'; राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका

मोदींची ती मुलाखत ‘मॅनेज’; राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका

Subscribe

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून तर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आरूढ झाल्यानंतर साडे चार वर्षांनंतर पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांनी ही मुलाखत दिली असल्याची टीका काँग्रेस आणि शिवसेनेने केली होती. आता राज ठाकरे यांनी देखील एक व्यंगचित्र काढून नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘एक मनमोकळी मुलाखत’ असे या मुलाखतीचे वर्णन करुन राज यांनी मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. नरेंद्र मोदी हेच स्वतःची मुलाखत घेत असल्याचे या व्यंगचित्रात दिसत आहे. तसेच मुलाखतकार नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘बोला काय विचारू?’ असा प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची ही मुलाखत मॅनेज असल्याची टीका राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रातून केली असल्याचे दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांसमोर बोलले पण…

#Modi2019Interview #PMtoANI #RajThackeray #PoliticalCartoon

Posted by Raj Thackeray on Wednesday, 2 January 2019

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मागच्या साडे चार वर्षांमध्ये त्यांनी कोणत्याही माध्यमाला मुलाखत किंवा पत्रकार परिषद घेऊन संबोधित केले नव्हते. पाच राज्यांमध्ये भाजपची जी धुळधाण झाली, त्यामुळेच त्यांना मुलाखत द्यावेसे वाटले, असे बोलले जात आहे. ९५ मिनिटे चाललेल्या या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी विविध विषयांवरील आपल्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या.

हे तर चहाच्या पेल्यातील वादळ – शिवसेनेचीही टीका

दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाती अग्रलेखातूनही मोदींच्या मुलाखतीवर टीका करण्यात आली आहे. मोदींच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले असल्याचे सांगून शिवसेनेनेही याची खिल्ली उडवली आहे. मोदींनी ९५ मिनिटांच्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना हात घातला असला तरी त्यातून जनतेच्या प्रश्नांना उत्तरे मिळालेली नाहीत. स्वतःची बाजू सांगण्यातच ही ९५ मिनिटे खर्च झाल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

- Advertisement -

राम मंदिराचा अध्यादेश, नोटाबंदी, पाकिस्तान आणि दहशतवादी हल्ले, काळा पैसा यावर मोदींकडून ठोस उत्तरे आली नसून २०१९ ची चिंता नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचा टोला अग्रलेखाच्या माध्यमातून लगावला आहे.


हे वाचलंत का – आता पाच रुपयात नरेंद्र मोदींना भेटा

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -