घरमहाराष्ट्रराज ठाकरे मातोश्रीवर

राज ठाकरे मातोश्रीवर

Subscribe

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेना सोडल्यापासून राज ठाकरे चौथ्यांदा मातोश्रीवर दाखल झाले. यासाठी कारणीभूत ठरले ते राज यांचे पुत्र अमित ठाकरे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेना सोडल्यापासून राज ठाकरे चौथ्यांदा मातोश्रीवर दाखल झाले. यासाठी कारणीभूत ठरले ते राज यांचे पुत्र अमित ठाकरे. अर्थात अमित ठाकरे यांच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या लग्नाचं आमंत्रण उद्धव ठाकरे यांना दिलं. अमितचं लग्न ठरल्यापासून राज ठाकरे कुणाकुणाला पत्रिका देणार? उद्धव ठाकरेंना आमंत्रण देणार का? याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. पण, राज यांनी राजकीय वैर बाजुला ठेवत अमितच्या लग्नाचं आमंत्रण उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. त्यानंतर राज ठाकरे जयदेव ठाकरे यांच्या निवासस्थानी रवाना झाले. यापूर्वी देखील राज यांनी नातं आणि राजकारण याची गल्लत होणार नाही अशी भूमिका घेतली होती. शिवाय, उद्धव ठाकरे आजारी असताना देखील राज ठाकरे यांनी लिलावती रूग्णालयापासून मातोश्रीपर्यंत उद्धव यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं.

राज यांनी अमितच्या लग्नाची पत्रिका यापूर्वी रतन टाटा यांना देखील दिली आहे. त्यानंतर राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील अमितच्या लग्नाची पत्रिका देणार असल्याचं बोललं जातंय. पण, सर्वाचं मुख्य लक्ष लागून राहिलं आहे ते, राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाची पत्रिका देणार का? याकडे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -