राज्यातील निवासी डॉक्टरांचा सरकारला इशारा

राज्यातील निवासी डॉक्टरांचा सरकारला इशारा

प्रातिनिधिक फोटो

राज्यातील ४ हजार ५०० पेक्षाही जास्त निवासी डॉक्टर्स आपल्या विविध मागण्यांसाठी लवकरच रस्त्यावर उतरणार आहेत. वारंवार आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करुनही डॉक्टरांना फक्त आश्वासनं मिळाली आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी याबाबत राज्य सरकारला पत्र पाठवलं आहे. त्यात २० डिसेंबर २०१८ पर्यंत सरकारने आमच्या मागण्यांबाबत विचार करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला आहे. या रास्तारोकोमध्ये महाराष्ट्रातील साधारणतः साडेचार हजारांहून अधिक निवासी डॉक्टर सहभागी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीना पत्र पाठवले

याविषयी केंद्रीय मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर यांनी सांगितलं की, ‘‘आपल्या मागण्यांसाठी निवासी डॉक्टर वारंवार आंदोलन करत आहेत. पण, सरकारकडून गेल्या ६ महिन्यांत फक्त आणि फक्त आश्वासन मिळाली आहेत. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांसह अनेक मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून २० डिसेंबरपर्यंत सर्व मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे. जर त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यभरातील निवासी डॉक्टर रास्ता रोको करतील. ’’

हेही वाचा – केईएम रुग्णालयातील बेपत्ता निवासी डॉक्टर हिमाचलमध्ये  

निवासी डॉक्टर सुरक्षित नाहीत

तसंच, रुग्णांच्या नातेवाईकांकडून आजही निवासी डॉक्टरांना मारहाण होते. ही मारहाण रोखण्यासाठी रुग्णालयात पास आणि अलार्म सिस्टिम सुरू करण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिले होते. पण, अजूनही मुंबईसह अकोला, औरंगाबाद, नागपूर आणि लातूरमधील वैद्यकीय रुग्णालयांत अद्यापही अलॉर्म सिस्टिम बसवण्यात आलेली नाही आणि जिथे लावले आहेत तिथे त्या सुरू नाहीत. तसंच, आजही रुग्णालयात सुरक्षारक्षकांचीही कमतरता आहे, असही निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

‘निवासी डॉक्टरांचे मानधन वाढले नाही’

डॉ. चिरवटकर पुढे म्हणाले की, ” मागील ३ वर्षात एकदाही निवासी डॉक्टरांचं मानधन वाढलं नाही आहे. त्यामुळे ही प्रमुख मागणी आम्ही सरकारपुढे ठेवत आहोत. तसंच, अनेक रुग्णालयांमध्ये बेसिक गोळ्या आणि औषधं उपलब्ध नाही आहे. त्यात पॅरासिटोमॉल या गोळीचा देखील समावेश आहे. फार्मासिस्टमध्ये औषधं उपलब्ध असल्याचा फलक आहे पण, औषधंच नाही आहेत. ही फक्त रुग्णांची गरज नाही आहे. त्यामुळे आता यापुढे किती वेळ वाट पाहायची असा प्रश्न आमच्यापुढे आहे. संवेदानिक मार्गातून सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही. ”

हेही वाचा – निवासी डॉक्टरांच्या संपाचा रुग्णांना फटका, तिसऱ्या दिवशीही डॉक्टरांचा संप सुरू

निवासी डॉक्टरांच्या मागण्या

अशा एकूण १५ मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत. शिवाय, या मागण्या येत्या २० डिसेंबरपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत, तर त्यानंतर महाराष्ट्रातील साडेचार हजार निवासी डॉक्टर ‘रास्ता रोको’ आंदोलन करणार आहेत.


हेही वाचा – डॉक्टरांवर मेस्मा लावणे चुकीचे; मध्यवर्ती मार्डचा निर्णयावर आक्षेप!

First Published on: November 15, 2018 9:35 PM
Exit mobile version