माझी गत स्टॅन स्वामींसारखी होऊ नये, वाझेची कोर्टापुढे कैफीयत

माझी गत स्टॅन स्वामींसारखी होऊ नये, वाझेची कोर्टापुढे कैफीयत

NIA कडून वाझेसह दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कोर्टाने सोमवारी एपीआय सचिन वाझे आणि पोलिस निरीक्षक सुनिल माने यांची कस्टडी एनआयएकडे देण्यासाठी नकार दिला आहे. एनआयएने कोर्टाकडे दाखल केलेला अर्ज कोर्टाकडून नामंजूर करण्यात आला. दोघेही एंटेलिया स्फोटक प्रकरण आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत आहेत. विशेष एनआयएचे न्यायमूर्ती यांनी एनआयएचा कस्टडीचा अर्ज फेटाळला. त्याचवेळी सचिन वाझे यांच्याकडून खाजगी रूग्णालयात ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. सचिन वाझे यांना स्वतःच्या खर्चाने ही शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले. पण सचिन वाझेने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे कोर्टात थोडे वेगळेच वातावरण झाले होते. सचिन वाझेने कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी (दिवंगत) फादर स्टॅन स्वामींप्रमाणे होऊ नये, असे म्हणणे वाझेने कोर्टासमोर मांडले.(sachin vaze to be operated at private hospital for heart blockage surgery)

सचिन वाझे यांनी शासकीय जे जे हॉस्पिटलमध्ये आपल्यावर उपचार व्हावेत अशी मागणी कोर्टाकडे केली होती. ह्दयविकाराशी संबंधित उपचारासाठी ही परवानगी मागण्यात आली होती. सचिन वाझे यांच्या ह्दयातील ब्लॉकेजेस काढण्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करून हे ब्लॉकेजेस काढणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी याआधीच व्यक्त केले आहे. एनआयएने या प्रकरणातील तपास आता अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले आहे. एनआयएने या गोन्ही पोलिस अधिकाऱ्यांची कस्टडी एनआयए कोर्टाकडे मागितली होती. एनआयएने याआधी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मासह आणखी चौघांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आणखी व्यक्तींचा समावेश असल्याचाही एनआयएचा अंदाज आहे. त्यामुळेच यांच्या एकत्र चौकशीसाठी एनआयएने दोन्ही अधिकाऱ्यांची कस्टडी मागितली होती. पण कोर्टाने मात्र या कस्टडीसाठी नकार दिला आहे. सध्या सचिन वाझे आणि सुनिल माने हे दोघेही न्यायालयीन कस्टडीत तळोजा कारागृहात आहेत.

कोर्टाने कस्टडी नाकारताना म्हटले आहे की, एनआयएने २८ दिवसांच्या कस्टडीचा कालावधी पुर्ण केला आहे. शिवाय वाझेंचा अवघा दोन दिवसांचा कस्टडीचा कालावधी शिल्लक आहे, तर मानेंच्या बाबतीत १६ दिवसांचा कस्टडीचा कालावधी शिल्लक आहे. या दोघांचीही न्यायालयीन कस्टडी ही बेकायदेशी कारवाई प्रतिबंधक कायद्याअंतर्गत घेण्यात आली आहे.

वाझे आणि माने या दोघांचीही पार्श्वभूमी ही पोलिस दलातील अधिकारी म्हणून आहे. या दोघांनाही चुकीच्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांचा तपास भरकटवण्याची चांगलीच माहिती आहे. पण यंत्रणांकडेही काही महत्वाचे धागेदोरे असल्यानेच या दोघांचाही ताबा वाढवून मिळावा अशी मागणी एनआयएकडून कोर्टाकडे करण्यात आली होती. सचिन वाझे आणि सुनिल माने हे दोघेही अधिकारी मनसुख हिरेन हत्या आणि एंटेलिया स्फोटके प्रकरणात १३ मार्चपासून अटकेत आहेत.


हे ही वाचा – Anil Deshmukh Case : अनिल परबांच्या खात्याशी संबंधित आरटीओ अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा


 

 

First Published on: August 30, 2021 5:23 PM
Exit mobile version