‘तिच्यावर कारवाई करा, हा मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय’; संजय राऊत गरजले

‘तिच्यावर कारवाई करा, हा मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय’; संजय राऊत गरजले

शिवसेना नेते संजय राऊत

मुंबईत वाहतूक पोलिसाला शिवीगळ करत त्याला मारल्या घटना घडली असून एक महिलेने केलेले हे कृत्य व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झाले आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खासदर संजय राऊत यांनीही या महिलेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंबंधीचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यात त्यांनी ‘या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय. Take Action’, असे नमूद केले आहे. त्याचबरोबर, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे.

काय आहे प्रकरण 

मुंबईच्या काळबादेवी परिसरात पोलिसांना भर चौकात तोंडात मारत आणि अश्लाघ्य आणि अर्वाच्य भाषेत शिव्या देत एका महिलेने अपमानित केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या महिलेला आणि तिच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसाने आपल्याला शिव्या घातल्याचा दावा या महिलेने केला आहे. मात्र, ही महिलाच पोलिसाला शिव्या आणि मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिला संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्याला थोबाडीत मारत असल्याचे दिसत आहे. शिवाय, मारताना त्याला अर्वाच्च्य शिव्या देखील देत असल्याचे दिसत आहे. मात्र, तरीदेखील पोलीस महिलेला विरोध करताना किंवा तिचा हात अडवताना दिसत नाही. दरम्यान, बऱ्याच वेळानंतर एक महिला पोलीस येऊन या महिलेला दूर सारत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

हेही वाचा –

मी टेन्शन फ्री, आता इतरांना टेन्शन : खडसेंचा भाजप नेत्यांना इशारा

First Published on: October 24, 2020 7:02 PM
Exit mobile version