‘पालघर दणकून घेणार’ – संजय राऊत

‘पालघर दणकून घेणार’ – संजय राऊत

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत

नाशिक-परभणी-हिंगोली ठासून घेतली आता पालघर दणकून घेऊ – संजय राऊत
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या ६ पैकी ५ जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने २, भाजपने २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे. मात्र या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपला टोला हाणला आहे.

शिवसेना आणि भाजप पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संजय राऊत यांनीही आजच्या निकालानंतर ही संधी सोडली नाही. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर येथे पोट निवडणूक होत असून, शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर दंड थोपाटून उभे राहिले आहेत. त्यातच आज जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निकालानंतर शिवसेनेचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. त्यामुळे आता पालघर देखील दणकून घेऊ असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला.

काही दिवसांपूर्वी भाजपचे आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन अशाप्रकारे ‘ठासण्याची’ भाषा वापरली होती. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून संजय रावतांनी खास त्याच शैलीत त्यांचे ट्वीट केले.

शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी
विधान परिषदेतील परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले. त्यांना एकूण २५६ मतं मिळाली. तर नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी, काँग्रेसच्या शिवाजी सहाणे यांचा पराभव केला. दराडेंना एकूण ४१२ मते मिळाली.

हे आहेत विधान परिषदेचे नवे आमदार – 

First Published on: May 24, 2018 11:28 AM
Exit mobile version