नाशिक-परभणी-हिंगोली ठासून घेतली आता पालघर दणकून घेऊ – संजय राऊत
जय महाराष्ट्र.
नाशीक आणी परभणी हिंगोली ठासून घेतले. बेईमान राजकारणाचा पराभव.
आता पालघर सुदधा दणकून घेऊ.— Sanjay Raut (@rautsanjay61) May 24, 2018
शिवसेना आणि भाजप पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संजय राऊत यांनीही आजच्या निकालानंतर ही संधी सोडली नाही. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पालघर येथे पोट निवडणूक होत असून, शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर दंड थोपाटून उभे राहिले आहेत. त्यातच आज जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निकालानंतर शिवसेनेचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. त्यामुळे आता पालघर देखील दणकून घेऊ असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला.
काही दिवसांपूर्वी भाजपचे आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन अशाप्रकारे ‘ठासण्याची’ भाषा वापरली होती. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून संजय रावतांनी खास त्याच शैलीत त्यांचे ट्वीट केले.
कर्नाटकात जिंकलो मतदारांचे आभार!
आता भंडारा जिंकू “ठोकून” !!!!!!!!!!आणि पालघर जिंकू “ठासून”!!!!!!!!!— ashish shelar (@ShelarAshish) May 15, 2018
हे आहेत विधान परिषदेचे नवे आमदार –
- अमरावती – प्रविण पोटे (भाजप)
- वर्धा – चंद्रपूर-गडचिरोली – रामदास आंबटकर (भाजप)
- नाशिक – नरेंद्र दराडे (शिवसेना)
- परभणी-हिंगोली – विप्लव बाजोरिया (शिवसेना)
- कोकण – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)