संजय राऊतांच्या लेखणीत नेमकं दडलंय काय? स्वतःवरच लिहित असलेल्या पुस्तकातून कोणता गौप्यस्फोट करणार?

संजय राऊतांच्या लेखणीत नेमकं दडलंय काय? स्वतःवरच लिहित असलेल्या पुस्तकातून कोणता गौप्यस्फोट करणार?

शिवसेनाचा(shivsena) आवाज अशी ओळख असलेले संजय राऊत(sanjay raut) यांना अटक करण्यात आली आणि त्या नंतर मात्र राऊतांची सकाळची पत्रकार परिषद बंद झाली. संजय राऊत यांना अटक होण्यापूर्वी ते रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर सडकून टीका करायचे. पण त्या नंतर विरोधक जे खोचक टोले लागावयाचे त्याचाही सामना राऊतांना करावा लागत असे. पण या सगळ्यात संजय राऊतांना अटक केल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद मात्र बंद झाली. अशातच आता संजय राऊत तुरुंगात काय करत असतील हा प्रश्न सुद्धा अनेकांना पडला असेल. तर सध्या संजय राऊत तुरुंगात एक पुस्तक लिहीत असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा –  संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ, 5 सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत(shivsena pm sanjay raut) सध्या तुरुंगात असले तरीही त्यांची लेखणी मात्र सुरूच आहे. संजय राऊत सध्या तरुंगात पुस्तक लिहित आहेत असं बोललं जात आहे. राऊतांवर दाखल करण्यात आलेल्या कथित पत्राचाळ(patrachal)  घोटाळ्या प्रकरणी ते पुस्तक लिहित असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत नेहमीच त्यांच्या वक्तव्यातून मोठी विधानं करत असतात. अशातच आता तुरुंगात संजय राऊत लिहीत असलेल्या पुस्तकातून नेमका कोणता गौप्य स्फोट करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा – साद घातली तर.., शर्मिला ठाकरेंचं उद्धव-राज एकत्र येण्यावर मोठं विधान

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपांखाली न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी आज संपली होती. पण पुन्हा त्यांची कोठडी वाढविण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे त्यामुळे संजय राऊत यांना 5 सप्टेंबर पर्यंत तुरुंगात राहावं लागणार आहे. त्याचबरोबर राऊत लिहित असलेल्या पुस्तकात नेमकं काय असणार हे जाणून घेणं महत्वचं.

हे ही वाचा –  शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार! दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकऱ्यांनी बोलावली महापंचायत

First Published on: August 22, 2022 3:26 PM
Exit mobile version