घरमहाराष्ट्रसाद घातली तर.., शर्मिला ठाकरेंचं उद्धव-राज एकत्र येण्यावर मोठं विधान

साद घातली तर.., शर्मिला ठाकरेंचं उद्धव-राज एकत्र येण्यावर मोठं विधान

Subscribe

तळागाळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बाळासाहेबांवर निष्ठा आहे. त्यामुळे कुठलाही पक्ष असता संपत नाही. मायावती, पासवानांचा पक्ष बघा, त्यांचा पक्ष संपलेला नाही. त्यांचा एक मतांचा कोटा असतो, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्यात

मुंबईः महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी दिवसागणिक बदलत आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अत्यंत सूचक विधान केलंय. पुण्यातील एका कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी हजेरी लावली होती, यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना उद्धव ठाकरे एकटे पडले असल्याचा प्रश्न विचारला यावर उत्तर देताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘त्यांना येऊ देत, साद घातली तर बघू’, असं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना आता संपत आली आहे का असे पत्रकारांनी विचारले असता शर्मिला ठाकरे म्हणाल्या, कुठलाही पक्ष संपत नसतो. तो पुन्हा वर येतो. बाळासाहेबांनी 50 वर्षांपूर्वी काढलेला पक्ष आहे. तळागाळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बाळासाहेबांवर निष्ठा आहे. त्यामुळे कुठलाही पक्ष असता संपत नाही. मायावती, पासवानांचा पक्ष बघा, त्यांचा पक्ष संपलेला नाही. त्यांचा एक मतांचा कोटा असतो, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्यात.

- Advertisement -

आपल्याकडे संधीच नाही, त्यामुळे लोकांना आश्वासने देण्यापेक्षा आपल्याकडे रस्ते आणि सुविधा दिल्यात तर जास्त बिझनेस आपल्याकडे येतील आणि लोकांना नोकऱ्या उपलब्ध होतील. नुसते आरक्षण देऊन नोकऱ्या मिळणार नाही. आपल्याकडे नोकऱ्या आहेत कुठे? सरकारी नोकऱ्या तर कधीच्या गायब झाले आहेत. चांगलं पायाभूत सुविधा उभ्या करा, नोकऱ्या आपोआप उभ्या राहतील, असंही शर्मिला ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

आम्ही कायम चांगल्या इच्छा व्यक्त करतो. मला वाटत की लोकांना पण कळलं असेल की मुंबई आणि महाराष्ट्रातील रस्ते नादुरुस्त आहे. पाण्याचा प्रश्न सुटलेला नाहीये. पुण्यात थोडंसं पाणी पडलं की गावात पाणी येते. ७५ वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य होऊन पण या गोष्टी कधीच व्हायला पाहिजे होत्या. महाराष्ट्र हा इन्कम टॅक्समधून देशाला ४० ते ५० तक्के उत्पन्न देतो. त्यामानाने महाराष्ट्र इतका मागासलेला आहे की राज्याची कोणतीही सीमा ओलांडा, लगेच रस्ते गुळगुळीत व्हायला सुरुवात होते. आपल्याकडेच फक्त खड्डे असतात. त्यामुळे तुम्हाला बदल घडवायला लागेल, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

हेही वाचाः संजय राऊतांचे काय होणार?, तुरुंगात राहणार की बाहेर येणार?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -