गोवंडीत चौदा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

गोवंडीत चौदा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

स्कॉलरशीप फॉर्म भरण्याचा बहाणा करुन एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक हाजी मोहम्मद सिराज शेख याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी बलात्कारासह पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच हाजी हा पळून गेला असून त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नेमके काय घडले?

१४ वर्षांची ही पिडीत मुलगी गोवंडी परिसरात राहत असून २७ सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजता ती हाजी मोहम्मद शेख याच्या गोवंडीतील शिवाजीनगर, कोकणी मशिदीजवळील रोड क्रमांक चारमध्ये आली होती. यावेळी त्याने तिला स्कॉलरशीपचा फॉर्म भरण्याचा बहाणा करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर ती घरी आली. मात्र, बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, नंतर तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. ही माहिती ऐकून त्यांना देखील धक्काच बसला होता. शनिवारी ५ ऑक्टोबरला त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हाजी मोहम्मद सिराज शेखविरुद्ध बलात्कारासह पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच हाजी हा पळून गेला आहे. त्याचा शोध सुरु असून त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.


हेही वाचा – डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या; आरोपीला फाशीची शिक्षा


 

First Published on: October 14, 2019 9:54 PM
Exit mobile version