पायल रोहतगीच्या ट्विट मागचा ‘बिग बॉस’ शोधायला हवा – शालिनी ठाकरे

पायल रोहतगीच्या ट्विट मागचा ‘बिग बॉस’ शोधायला हवा – शालिनी ठाकरे

मनसेच्या सरचिटणीस आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे

अभिनेत्री पायल रोहतगीने शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्य ट्विट केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मनसेच्या सरचिटणीस आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी रोहतगीवर टीका केली आहे. याशिवाय पायल रोहतगीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची बदनामी करवून घेणारा बिग बॉस कोण आहे? ते शोधायला हवे, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पायल रोहतगीवर टीका केली आहे.

हेही वाचा – पायल रोहतगीने केले शिवाजी महाराजांचाबद्दल आक्षेपार्ह ट्विट

नेमकं काय म्हणाल्या शालिनी ठाकरे?

‘स्वत:ला रामभक्त आणि नमोभक्त म्हणवणारी पायल रोहतगी भाजपची ट्रोलर असून ती समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. याअगोदर तिने राजा राममोहन रॉय यांच्याबाबत आक्षेपार्य टीका केली होती. त्यानंतर आता तिने छत्रपती शिवरायांवर अशोभनीय टीका केली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी ही बाई कुठल्याही थराला जाऊ शकते. परंतु, तिच्या या कृती मागचा नेमका बिग बॉस कोण? हे शोधायला हवे’, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.

First Published on: June 3, 2019 7:00 PM
Exit mobile version