घरट्रेंडिंगपायल रोहतगीने केले शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह ट्विट

पायल रोहतगीने केले शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह ट्विट

Subscribe

काही दिवसांपूर्वी राजा राममोहन रॉय यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पायल रोहातगीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करणार ट्विट केलं आहे.

काही दिवसांपूर्वी राजा राममोहन रॉय यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पायल रोहतगीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करणार ट्विट केलं आहे. यावेळी पायलने थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तिचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. पायलच्या या वादग्रस्त ट्विटमुळे तिला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काय आहे ट्विटमध्ये 

‘छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म शुद्र जातीत झाला’, असे वादग्रस्त वक्तव्य तिने केले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्तरांमधून टीकेची झोड उठत आहे. पायलने ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे वादग्रस्त विधान केलं आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शुद्र जातीत झाला होता”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ट्विटरसोबतच तिने इन्स्टाग्रामवरही अशीच पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या वक्तव्यावरुन तिने थेट मराठा आरक्षण आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत मुक्ताफळं उधळली आहेत.

- Advertisement -

नुकतेच तिने शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासंबंधीची एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. त्यातही तिने हिंदुत्वाचा राग आळवला आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील पायलने अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. पायल आतापर्यंत राजा राममोहन रॉय, कमल हासन यांच्यावर टीका करुन चर्चेत आली आहे. मात्र आता तिच्या या वादग्रस्त वक्तव्यांना काय उत्तर मिळेल, हे पहावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -