शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली, खासदार संजय राऊतांची घोषणा

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली, खासदार संजय राऊतांची घोषणा

Shiv Sena leader Aditya Thackeray will leave for Ayodhya on June 10

शिवसेना नेते मंत्री आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. खासदार संजय राऊतांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरातील शिवसैनीक अयोध्येत दाखल होतील. अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील हिंदूंनीही आम्हा अयोध्या भेटीचे निमंत्रण दिले आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

अस्सल हिंदुत्वाच् स्वागत –

यावेळी त्यानी अस्सल हिंदुत्वाचे त्यांना स्वागत करायचे आहे, असा टोला राज ठाकरे यांना लगावला. यावेळी आमचा दौरा राजकीय नाही. आम्ही एका श्रद्धेतून अयोध्येला जाणार आहोत. भक्तीभावाने अयोध्येला गेल्यावर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो. राजकीय हेतून गेल्यावर राम कधीच आशीर्वाद देत नाही, अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. जोरात स्वागत केले जाणार आहे. अयोध्येत कोण जाते, कोण नाही काहीही फरक पडत नाही. श्रीराम सर्वांचे आहेत. ते सर्वांना आशीर्वाद देतात. मात्र, कोणी राजकीय कारणाने जात असेल किंवा कोणाला तरी कमी लेखण्यासाठी जात असेल तर त्यांचा आशीर्वाद मिळत नाहीत. तिथे विरोध होतो. उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व आंदोलनात होतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर अयोध्येत गेले होते. आता आदित्य ठाकरे जाणार आहेत. 10 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येत जातील. 10 जूनची तारीख नीश्चीत झाली आहे. आदित्य ठाकरेंसोबत सर्व शिवसैनिक जाणार आहेत. असे राऊत म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर –

दरम्यान 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. कोण असली कोण नकली हे सारा देश पाहत असल्याचे मनसे दादर विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहे. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व नकली आहे. असली कोण, नकली कोण शिवसेना ठरवेल. उगाच आम्हाला डिवचू नका असा इशारा मनसेने दिला आहे.

First Published on: May 8, 2022 11:02 AM
Exit mobile version