दिलासा! अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा

दिलासा! अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल ट्रेन सध्या बंद असून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल धावत आहेत. यादरम्यान एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी ओळखपत्र तसंच हॉल तिकीट दाखवत लोकलने प्रवास करु शकणार आहेत.

मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या तसेच स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओळखपत्र आणि हॉल तिकीटच्या आधारे विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.

दरम्यान, विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स सुरु केली जाणार असल्याची माहितीही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेने इतरांना स्थानकांवर गर्दी करु नका असे आवाहन करताना प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून राज्यांतर्गत ट्रेन बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वे विभागाने बारा गाड्यांना परवानगी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाड येथून पहिली ट्रेन मनमाड येथून प्रवाशांना घेऊन मुंबईला धावली.


ड्रग्ज प्रकरणात रियाने घेतली बॉलिवूडच्या ‘या’ २५ सेलिब्रिटींची नावं; NCB करणार चौकशी!

First Published on: September 12, 2020 1:29 PM
Exit mobile version