उद्धव ठाकरे म्हणाले, हा तर चुना लावणारा आयोग

उद्धव ठाकरे म्हणाले, हा तर चुना लावणारा आयोग

उद्धव ठाकरे

 

मुंबईः हा निवडणूक आयोग नाही. हा तर चुना लावणारा आयोग आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. आमचा निवडणूक आयोगावरून विश्वास उडाला आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मराठी भाषा दिनानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृह येथे ठाकरे गटाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. ही सुनावणी सुरु असताना निवडणूक आयोगाने त्यात नाक खूपसण्याची गरज नव्हती. बहुतेक त्यांना सर्वोच्च न्यायालयातील निकाल विरोधात जाईल याचा अंदाज आला असावा. त्यामुळेच त्यांनी तातडीने निकाल जाहिर केला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, आता ५६ वर्ष होऊन गेली. ३ तारखेला शिवराय संचलन आहे. जिथे मराठी माणसासाठी दरवाजे बंद होते तिथे आज दिमाखात शिवराय संचलन सुरु आहे. त्याकाळी मराठीची प्रचंड अव्हेलना होत होती. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या हातात आत्मविश्वासाची तलवार दिली. तेव्हाचे रावते, सावंत आजही आहेत. मी अनेक संकट बघत आलोय. १९ जून १९६६ मी लहान होतो तेव्हा सहदेव नाईक पण होते, त्यानंतर त्याला धुमारे फुटले. आणीबाणीच्या काळात जे घडले त्या सगळ्याला शिवसेनाप्रमुखांचा पाठिंबा नव्हता. रावते स्वतः गाडीवर मार्मिक घेऊन जायचे. ही मूळ घट्ट आहेत.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, अधिवेशनात राज्यपालांनी आज हिंदीतून भाषण केले. सगळ्यांना आज इथे बघून छान वाटलं. निवडणुक आयोग बोगस आहे. त्याला चुना लावणारा आयोग म्हणायला हवे. पासवान यांच्या पक्षाचा दोन नावे व चिन्हे देण्यात आली. मात्रे ते भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे तेथे काहीच घडले नाही.  भाजपच्या सोयीने सुरु आहे. आता सगळ्यांना पटायला लागलय की २०२४ ची निवडणुक कदाचित शेवटची असेल. कपिल सिब्बल जे म्हणाले ते योग्यच आहे. घटना स्पष्ट आणि स्वच्छ आहे.

कायदा मंत्री किरन रिजीजू म्हणाले व उपराष्ट्रपती जगदीप धनकड हे न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही न्यायालयात रामशास्त्री आहेत. निवडणुक आयोग आणि न्यायालय यात अंतर आहे. ज्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही ते आज स्वातंत्र्य धोक्यात आणताहेत. ठाकरे नाव वगळून शिवसेना चालवून दाखवा, असं  माझ गद्दारांना आव्हान आहे. गद्दारांच्या वडिलांना पण वेदना होत असतील कसली कार्टी निपजली, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

First Published on: February 27, 2023 9:29 PM
Exit mobile version