पगार मिळेपर्यंत पाणी विकून पैसे घ्या; कंत्राटदाराची सूचना

पगार मिळेपर्यंत पाणी विकून पैसे घ्या; कंत्राटदाराची सूचना

कोरोना संकटात दिलासा; ४७ हजार लोकांना मिळणार रोजगार

वॉटर व्हेंडिंग मशीनच्या कंत्राटदारांनी पाणी विका आणि पैसे घेऊन जा अशी मुभा कर्मचाऱ्यांना दिली आहे. ही मुभा देण्याचे कारण म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून वॉटर व्हेंडिंग मशीनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कर्मचारी दररोज पाणी विकून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.

लवकरात लवकर थकीत वेतन द्यावे

इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टूरिझम कोपोर्रेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर ८३ वॉटर व्हेंडिंग मशीन बसविल्या आहेत. या मशीन चालविण्याकरिता खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या मशिनवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांना मासिक ११ हजार रुपये वेतन दिले जाते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारही दिला होता. त्यावेळी कंत्राटदार कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलासा म्हणून दिवसाला जेवढे पाणी वॉटर व्हेंडिंग मशीनद्वारे विकले जाते, तेवढे पैसे स्वत:कडे ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, काही रेल्वे स्थानकांवर दिवसाला केवळ २०० रुपयांची पाण्याची विक्री होते. त्यामुळे कंपनीने लवकरात लवकर थकीत वेतन द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांना लवकरच चार महिन्यांपासून थकलेले वेतन दिले जाईल. त्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे.  – पियुष्य पुष्कर, समन्वयक; आर्च कंत्राटदार कंपनी


हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर ४० दिवसांचा ब्लॉक; प्रवाशांचे हाल


 

First Published on: November 18, 2019 1:04 PM
Exit mobile version