घरमुंबईपश्चिम रेल्वेवर ४० दिवसांचा ब्लॉक; प्रवाशांचे हाल

पश्चिम रेल्वेवर ४० दिवसांचा ब्लॉक; प्रवाशांचे हाल

Subscribe

पश्चिम रेल्वेवरील लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ४० दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवरील लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ४० दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. १३ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या काळात मध्यरात्री १.२५ ते पहाटे ५.२५ वाजेपर्यंत विरार दिशेकडील धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरच्या काही लोकल देखील रद्द करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

‘या’ मार्गात बदल

पहाटे ४.१५ ची चर्चगेट-विरार लोकल, पहाटे ४.१९, ४.३८, ४.४६, ५ ची चर्चगेट-बोरीवली लोकल मुंबई सेंट्रल ते माहिम स्थानकादरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येईल. या लोकल महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड या स्थानकावर थांबणार नाहीत.

- Advertisement -

रद्द लोकल फेऱ्या

पहाटे ५.०६ वाजता महालक्ष्मीहून भाईंदर जाणारी लोकल
पहाटे ५.२० वाजता महालक्ष्मीहून बोरीवली जाणारी लोकल
सकाळी ६.०७ वाजता बोरीवलीहून चर्चगेट जाणारी लोकल
सकाळी ६.२७ वाजता बोरीवलीहून चर्चगेट जाणारी लोकल


हेही वाचा – ठरलं, भाजप मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -