वर्षावर युतीच्या वरिष्ठ नेत्यांची पार पडली बैठक; सरांनी केलं मार्गदर्शन

वर्षावर युतीच्या वरिष्ठ नेत्यांची पार पडली बैठक; सरांनी केलं मार्गदर्शन

उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा-शिवसेना युती झाली असून आज, मंगळवारी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या चहापानला मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, जगन्नाथ पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गप्पा केल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी निवडणुकांबद्दल दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांना मार्गदर्शन देखील केले. दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एक चहापान कार्यक्रम व्हावा, असा उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरला होता. त्यानुसार या चहा पानाला ज्येष्ठ नेत्यांना देखील बोलावण्यात आले होते. दरम्यान, यावेळी मनोहर जोशी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांनी देखील आपापले अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना सांगितले.

पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रयत्न

सेना-भाजपा युती झाली असली तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मात्र अद्याप मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत देखील मार्गदर्शन घेण्यात आले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या वरिष्ठ नेत्यांसोबत दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना चहापानावर बोलवून समन्वय साधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असून, लवकरात लवकर सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरून प्रचाराच्या कामाला लागण्यावर नेत्यांनी भर द्यावा, असे आदेश देखील देण्यात आले.

First Published on: March 26, 2019 9:03 PM
Exit mobile version