वसई-विरार महापालिकेतील ५० मोठे घोटाळे बाहेर काढणार – किरीट सोमय्या

वसई-विरार महापालिकेतील ५० मोठे घोटाळे बाहेर काढणार – किरीट सोमय्या

घोटाळ्यांचे आरोप करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर बरसले आहेत. विरारमध्ये भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी किरीट सोमय्या यांनी वसई-विरारमध्ये पोल-खोल अभियान सुरू करून महापालिकेतील ५० मोठे घोटाळे बाहेर काढण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांना दिले. त्याचप्रमाणे शिवसेनेवर टीकास्त्र सोडत ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज नेते, ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांचा निकाल लावणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची आणि मंत्र्यांची थेट नावे त्यांनी घेतली. सर्वांचा हिशोब केला जाईल, असे सांगत सरकारवर निशाणा साधला.

यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने एका रात्रीत १९ बंगले गायब केल्याचे सांगितले. विरारमध्ये भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेनेला लक्ष केले. ठाकरे सरकारमधील नेत्यांवर आरोप करत, अनेक मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणले आहेत. आता ठाकरे परिवाराची पाळी आहे, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, संपूर्ण भारतीयांसाठी राम आणि रामभक्त हनुमान आदर्श आहेत, असेही वक्तव्य यावेळी सोमय्या यांनी केले.

हेही वाचा – 

तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा अधिकार,संजय राऊतांचा भाजपला इशारा

First Published on: May 8, 2022 9:11 PM
Exit mobile version