तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा अधिकार,संजय राऊतांचा भाजपला इशारा

शिवसेनेने आयोजित केलेल्या सोशल मीडिया मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरसारखे इव्हेंट्स करतात. मोदी पूर्णपणे हिटलरला फॉलो करतात. त्यामुळे मोदींच्या प्रचारात आणि हिटलरच्या प्रचारात बरंच साम्य आहे. आपल्याकडे विरोधकांना बदनाम करण्याची सुरूवात झाली ती हिटलरनीती आहे. विरोधक आपल्याला बदनाम करायला लागले. पण आपण नैतिकता सांभाळत बसलो. पण तुम्ही जर नैतिकता सांभाळत नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे, अशा इशारा संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.

मोदी हिटलरला फॉलो करतात

सोशल मीडिया हा माझा विषय नाही. सोशल वर्क तसं सोशल मीडिया करा. यामध्ये खूप तांत्रिक गोष्टी आहेत. मला इंग्लिश येत नाही, मी मराठीत लिहितो, सामना मराठीत निघतो पण देशभरात बातमी होते. शिवसेनेशिवाय सोशल मीडिया पुढे जाऊ शकत नाही. बाळासाहेब आमचे फेस होते, त्यावेळी सोशल मीडिया कुठे होती? हिटलर सगळ्यांना प्रिय होता, बाळासाहेबांना देखील आवडायचा. आता पंतप्रधानांनाही हिटलर आवडतो. मोदी हिटलरला फॉलो करतात. ज्या प्रकारचे इव्हेन्ट हिटलर करायचा, त्याचप्रकारे इव्हेन्ट आता मोदी करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेबांनी गरम रक्ताची पिढी राजकारणात आणली

शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है. बाळासाहेबांनी गरम रक्ताची पिढी राजकारणात आणली. बाळासाहेब तरुणांचे नेते होते. शिवसेना हा तरुणांचा पक्ष आहे. ताकद सेनेची आहे आणि सेनेचीच राहील. देशातील सर्वांत मोठा ब्रॅंड शिवसेना आहे. जे खरं असतं ते लोकप्रिय होतंच असं नाही, तर जे लोकप्रिय असतं ते खरं असतंच असं नाही. सध्याचं राजकीय वातावरण असंच काहीसं आहे, असं राऊत म्हणाले.

राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्यामागे भाजपचा हात

हे राज्य आपण भारतीय जनता पक्षाच्या हातून खेचून घेतले आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून विषारी प्रचार करण्यात आला. मी जर रोज सकाळी बोललो नाही तर भाजपाचा कार्यक्रम सेट होणार नाही. अंगावर येणाऱ्यांना डम्‍पिंगमध्ये फेकून दिलं जाईल. राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्यामागे भाजपचा हात आहे, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा : बारामतीच्या विकासकामांवर दादांचा वॉच, रात्री ११ वाजता साईट विझीट