विक्रमगडमधील देहर्जा नदीवरील बंधाऱ्याला दहा महिन्यात गळती

विक्रमगडमधील देहर्जा नदीवरील बंधाऱ्याला दहा महिन्यात गळती

विक्रमगड तालुक्यातील शिळ-देहर्जे गावाच्या हद्दीवरुन वाहत असलेल्या देहर्जे नदीवर दहा महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून शिळ आणि देहर्जे या गावाच्या दरम्यान सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र, कमी दर्जाच्या कामामुळे अवघ्या दहा महिन्यातच या बंधार्‍याची आतील बाजू वाहून गेल्यामुळे बंधार्‍यात पाणी राहत नसल्याने हा बांधरा मात्र नदीतील शोभेची वास्तू म्हणून उभा राहिला आहे. बंधारा बांधल्यानंतर पहिल्या पावसाच्या पुरातच या बंधार्‍याच्या खालील बाजूस मोठे भगदाड पडले आहे. बंधार्‍याला मोठी गळती लागली आहे. तसेच बांधर्‍यामधे अनेक ठिकाणी छिद्र पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. एकीकडे विविध योजनेअंतर्गत शासन पाण्याच्या साठ्यासाठी बंधार्‍यावर प्रचंड खर्च करत आहे. त्यामुळे विक्रमगड तालुक्यातील गावांसाठी तसेच आजुबाजूच्या पाड्यांमधील शेतकरी तसेच गुरेढोरे यांच्या पिण्यासाठी हा बंधारा उपयोगी पडणारा आहे. मात्र बंधार्‍याच्या कमी दर्जाच्या कामामुळे १० महिन्यातच गळती लागली आहे. या बंधार्‍याची तात्काळ दुरुस्ती करून पाणी आडवण्याची मागणी येथील नागरीक व शेतकरी करत आहेत.

या बंधार्‍याला गळती लागली असल्याची कुठलीही लेखी तक्रार दाखल नाही. मी या बंधार्‍याची दोन दिवसात पाहणी करतो.
– आर. के. पाटील, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद


प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला – पालकमंत्री दादा भुसे 

माहिम केळवे धरण गळतीमुळे खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच आवश्यकतेनुसार एनडीआरएफची टीमसुद्धा तैनात करण्यात आली होती. परिसरातील गावामधील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची तयारीसुद्धा जिल्हा प्रशासनाने केली होती. या उपाययोजना जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या देखरेखीखाली गळती प्रतिबंधक कामे वेळीच जिल्हा प्रशासनाने केल्यामुळे होणारा अनर्थ टाळता आला आहे, असे कृषी, माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. झांझरोळी गावाजवळील माहिम केळवे लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत असलेल्या धरणात गळती लागली होती. यागळती प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाची पाहणी पालकमंत्री दादा भुसे यांनी करून वरीष्ठ अधिकारी यांना सुचना केल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच पाटपंबधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –

Corona Virus: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

First Published on: January 11, 2022 3:35 PM
Exit mobile version