पालघर लोहमार्ग पोलिसां (GRP) च्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक

पालघर लोहमार्ग पोलिसां (GRP) च्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक

नदीम शेख

पालघर येथील पालघर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना पकडले आहे. पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकावर पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांकडून सापडा रचून करण्यात आलेली या कारवाईत पालघर लोहमार्ग पोलिसांचे दोन कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात अटक करण्यात आली असून याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर लोहमार्ग पोलिसांचे पोलीस नाईक अकिल पठाण व पोलीस शिपाई समाधान नरवाडे यांनी रेल्वेत प्रतिबंधित गुटक्यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमांना रेल्वेत गुजरात हुन प्रतिबंधित गुटख्यांची वाहतूक करताना रंगेहात पकडले होते, परंतु कारवाई करण्याऐवजी कारवाई न करण्यासाठी तसेच पुढेही प्रतिबंधित गुटख्यांची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दर महिना हप्ता म्हणून १० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराने याची तक्रार पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली असता पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याबाबत खात्री केली असता डहाणू रेल्वे स्थानकावर सापडा रचून पालघर लोहमार्ग पोलिसांच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.

ही कारवाई पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक नवनाथ जगताप यांनी आपल्या पथकासह केली असता या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, हवालदार अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा, नवनाथ भगत, नामदार सखाराम दोडे व स्वाती तारवी पथकात सामील होते.


हे ही वाचा – मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाची कारवाई

First Published on: November 28, 2022 8:30 PM
Exit mobile version