पालघर तालुक्यातील गावांचे ड्रोनद्वारे गावठाण भूमापन 

पालघर तालुक्यातील गावांचे ड्रोनद्वारे गावठाण भूमापन 

महास्वामित्व योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय सर्वेक्षण विभागामार्फत पालघर तालुक्यातील मनोर, नेटाली, कोंढाण, दामखिंड,अंभान, टेन टाकवाल, अंभांन, बांधन, वाडे चिल्हार, खुटल, ओढानी, वेळगाव, मनोरतर्फे नांदगाव आदी १० ग्रामपंचात हद्दीतील गावामध्ये ड्रोनद्वारे गावठाण सव्हेक्षण सुरुवात करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ७७० गावांपैकी ४८२  गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. गावातील गावठाणाच्या हद्दीचे नकाशे तयार करून  जमीन मालकाना  सनद देण्यात येणार आहे.  राज्यातील सर्व गावांच्या गावठाणाच्या जमीनींचे जीएसआय आधारीत सर्वेक्षण व भूमापन करणेबाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व भारतीय सर्वेक्षण विभाग, भारत सरकार यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यास महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग ड्रोनद्वारे गावठाण भूमापन हा प्रकल्प महत्वकांक्षी व जनताभिमुख प्रकल्प असुन सदर प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन अचुक व जलद गतीने मोजणी काम सुरू करण्यात येणार आहे.

गावठाण क्षेत्रात राहणाऱ्या  लोकांकडे यापूर्वी मालकी हक्क पुरावा नव्हता. या सर्वेक्षणानंतर पुरावा त्यांना प्राप्त होईल. त्याचबरोबर  त्यांना सनद देणार आहोत प्रॉपर्टी कार्डमुळे भविष्यात खरेदी-विक्री वारस नोंदीसाठी अडचण निर्माण होणार नाही. या सर्वेक्षणामध्ये ग्रामपंचायतीचे उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणार आहे.
– महेश इंगळे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख वभागात

महास्वामित्व ड्रोन गावठाण योजनेमुळे शासनाच्या मिळकतींचे संरक्षण होणार असून ग्रामस्थांना त्यांचे मालकी हक्काचा नकाशा व अभिलेख मिळकत पत्रिका (Property Card) मिळणेस मदत होणार आहे. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे ग्रामस्थांना घरावर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होणार असून मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता आल्यामुळे गावाची आर्थिक पत उंचवणेस मदत होणार आहे. ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन करणे यासाठी अचुक अभिलेख व नकाशा उपलब्ध होणेस सदर योजनेमुळे मदत होणार आहे.त्यामुळे गावात शेजारी राहणारे अथवा नातलगामध्ये थोड्याश्या जमिनीसाठी होणारे वादविवाद किंवा कोर्ट कचेऱ्या यापासून सुटका होणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा –

संगमेश्वर तालुक्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस, आंबा, काजूसह फळ पिकांचे नुकसान

First Published on: April 22, 2022 8:37 PM
Exit mobile version