घरताज्या घडामोडीसंगमेश्वर तालुक्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस, आंबा, काजूसह फळ पिकांचे नुकसान

संगमेश्वर तालुक्यात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस, आंबा, काजूसह फळ पिकांचे नुकसान

Subscribe

संगमेश्वर, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार वारे सुटले होते. तर संगमेश्वर आणि सिंधुदुर्गात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातही गारांचा पाऊस पडला आहे. गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. शनिवारी पश्चिम महाराष्ट्राती काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गर्मीमध्ये अचानक पाऊस पडला असल्यामुळे काही काळ कोकणात थंड वातावरण निर्माण झालं आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार सायंकाळी ५.३० वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. परंतु पाऊस अचानक सुरु झाल्यामुळे शेतकरी आणि झोपडीमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शेतकऱ्यांकडूनही आपली शेती वाचवण्याचे प्रयत्न झाले आहेत. दरम्यान अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर फळ पिकांचेही नुकसान झाले आहे.

- Advertisement -

संगमेश्वर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळी ५.३० च्या दरम्यान वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. यानंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि कामगारांना चांगलाच तडाखा सहन करावा लागला. दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचीही पावसामुळे पळताभुई झाली होती. वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत परंतु त्यामध्ये अद्याप जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

उद्या कोकण, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता

- Advertisement -

राज्यात शनिवारी कोकण, मराठवाडा, गोवा , मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर मराठवाड्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील ४ दिवस काही भागात कोरडे वातवारण तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा : …तर चौथा स्तंभ कोसळण्यास वेळ लागणार नाही, शरद पवारांनी व्यक्त केली भीती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -