पोलादपुरातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा

पोलादपुरातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा

पोलादपूर: पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी पंचायत समितीने पाणीनिवारण कृती आराखडा तयार केला असून त्यासाठी ९४ .१० लाख रूपयांचा खर्च अंदाजित करण्यात आला आहे. राज्य व केंद्र सरकारने ग्रामीण भागात पाणी टंचाई निवारण्यासाठी पथदर्शी पायलट कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलशिवार योजना, लघुनळ पाणीपुरवठा योजना, शिवकालीन पाणी साठवण योजना, विशेष दुरुस्ती नळ पाणीपुरवठा योजना, पाणी उध्दभवाचे बळ कटीकरण योजना, विस्तारीकरण योजना, विंधन विहीरविहीर खोलीकरण व गाळ काढणे आदी विविध योजना गेल्या वीस वर्षात डोंगराळ दुर्गम अतिदुर्गम भागातील गाववाड या वस्त्यांवर राबविल्या आहेत.
आता नवीन जलजीवनमिशन योजनेची अंमलबजावणी सुरु असून आतापर्यंत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग महाराष्ट्र जल प्राधीकरण पंचायत समिती पोलादपुरसारख्या शासनाच्या यंत्रणांकडून राबबविलेल्या या योजनांवर कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र मार्चच्या अखेरपासून तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दरवर्षी निर्माण होत आहे. साहजिकच शासनाच्या यंत्रणा या पूर्णपणे कुचकामी ठरल्या असून कोट्यवधी रुपयांच्या विविध योजनांवर करण्यात आलेल्या निधीच्या पैशाचे अक्षरशःमातेरे झाले आहे. त्यामुळे दर वर्षाप्रमाणे यंदाही पाणीटंचाई ला तोंड देण्या साठी पाणीनिवारण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, त्यासाठी ९४ .१० लाख रूपयांचा अंदाजित खर्च होणार आहे.

३६ गावे, ९४ वाड्यांचा समावेश
कृती आराखड्यात टँकरने तूटवली क्षेत्रफळ कुडपण खुर्द /बु., कोतवाल, गोळेगणी, वाकण गावठाण, काटेतळी, मोरसडे, तामसडे, बालमाची अशा दुर्गम अतिदुर्गम भागातील १२ गावे ४७ वाड्यांचा समावेश असून या गावाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता १४.७५ लाख तर ४ गावे १वाडीमधील नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच विहीर दुरूस्ती करिता पावणेदोन लाखआणि विंधन विहीरीकरिता ७ लाख८० हजारांची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक विहीरींचे खोलीकरण आणि गाळ काढणे यात१५ गावे तसेच ३२ वाड्या समाविष्ठ असून त्याकरिता अंदाजित ५४ लाख ४० हजार खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्षी ३६ गावे तसेच ९४वाड्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पावणे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा
कृती आराखडा आहे.

First Published on: March 19, 2023 10:00 PM
Exit mobile version