‘वॉक ऑन राईट’ अंतर्गत प्रवाशांमध्ये जागृती; उजव्या बाजूने चालून अपघात टाळण्याचे आवाहन

‘वॉक ऑन राईट’ अंतर्गत प्रवाशांमध्ये जागृती; उजव्या बाजूने चालून अपघात टाळण्याचे आवाहन

चौक: रस्त्यावरून पायी चालताना उजव्या बाजूने चालून अपघात टाळा, असे आवाहन ठाणे मोटर वाहन निरीक्षक विनोद सुंदराणी यांनी केले आहे.प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने ‘वॉक ऑन राईट’ हा जनजागृती साठी उपक्रम राबविला जात आहे. मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर वावंढळ येथे पायी वारी करणार्‍या प्रवासी, भक्तगण यांना उजव्या बाजूने चालणे या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करताना मोटर वाहन निरीक्षक सुंदराणी बोलत होते.
याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने या नियमावलीत झालेला बदल बाबत सर्व जनतेला योग्य पद्धतीने समजावून सांगणे, याचा फायदा व भविष्यात अपघात घडणार नाहीत यासाठी हा उपक्रम पायी प्रवास करणार्‍या प्रवाशांना सांगण्यासाठी घेण्यात येत आहे. लोणावळा येथे आई एकवीरा देवीचा उत्सव सुरु असून हजारो लोक मुंबई पुणे रस्त्याने पायी प्रवास करीत आहेत. त्यांनाही या नियमांची माहिती देण्यात येत आहे. मोटार वाहन निरीक्षक सपना चींतल, सहाय्यकमोटार वाहन निरीक्षक संदीप येडे आदी उपस्थित होते.

हॉर्न वाजविण्याची गरज नाही
सध्या चैत्र महिन्यात जत्रोत्सव साजरा केला जातो. अनेक गावांतून पायी पालखी सोहळा, दिंडी सोहळा, तिर्थ क्षेत्र ठिकाणी देवदर्शनाला पायी चालत प्रवास करणे सुरू आहे. हे सर्व भक्तगण आणि रोजच्या दैनंदिन जीवनात प्रवास करणारे हे रस्त्याच्या डाव्या बाजूनेच प्रवास करतात. त्यात अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पूर्वीच्या डाव्या बाजूने चालणे यात नुकताच बदल करण्यात आला आहे. उजव्या बाजूने चालत गेल्यास समोरून येणारे वाहन पार होईपर्यंत आपल्या नजरेत राहते. मागून येणार्‍या वाहनाच्या विरुद्ध दिशेला आपण असल्याने वाहन चालक याला हॉर्न वाजविण्याची गरज भासत नाही, त्यामुळे ध्वनी प्रदुषण रोखता येते.

First Published on: March 27, 2023 9:48 PM
Exit mobile version