महाड तालुक्यात पावसामुळे जमिनीला भेग, भूवैज्ञानिकांकडून पाहणी

महाड तालुक्यात पावसामुळे जमिनीला भेग, भूवैज्ञानिकांकडून पाहणी

मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचले आहे. तर काही ठिकाणी नदीच्या पाणीपात्रात देखील वाढ झाली आहे. अशातच महाड त्यालुक्यातील बावळे गावातील परिसरात पावसामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत भूवैज्ञानिकांनी घटना स्थळी जात जमिनीची पाहणी केली आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला.

हे ही वाचा –  कोकणात ऑरेंज अलर्ट; रेल्वे रुळांवर पाणी, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

राज्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला तर काही ठिकाणी जमिनीची दुर्दशा झाली. राजगड जिल्यातील महाड तालुक्यात असलेलया बावळे या गावाच्या परिसरात पावसामुळे जमिनीला भेगा पडल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या संदर्भात निर्देश दिले त्यानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेश मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशिद यांनी बावळे गावपरिसराला भेट देऊन तेथील जमिनीला पडलेल्या भेगेची पाहणी केली.

हे ही वाचा – मुंबईला तुंबवून दाखवलं…, अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

 

हे ही वाचा – मुंबई परिसरात मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवस आरेंज अलर्ट

महाड तालुक्यामधील बावळे गावाच्या परिसरात जमिनीला पडलेली भेग ही उत्तर – दक्षिण असून त्याची लांबी सुमारे १५ ते २० मीटर एवढी आहे तर या भेगेची खोली दीड ते दोन दूत एवढी आहे. या भेगेत पावसाचे पाणी साचले आहे. यावरून मातीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त वाढल्याने जमिनीला भेग पडली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. यासंदर्भांत सविस्तर अभ्यास करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, पुणे यांना सुद्धा कळविण्यात आले आहे.

हे ही वाचा –  रायगड जिल्ह्यातील निसर्ग, वन पर्यटनाची कामे सुरु करणार; वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे…

दरम्यान या भेगांची प्राथमिक पाहणी केल्या नंतर या भेगांमुळे कोणत्याही प्रकारचा धोका नागरिकांना नाही तत्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर या भेगेची दररोज दोन ते तीन वेळा पाहणी केली जाईल आणि जर का त्यात काही बदल असल्यास स्थानिक प्रशासनाला त्या संदर्भात त्वरित कळवावे अश्या सूचनाही सरपंच आणि गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

First Published on: July 5, 2022 3:33 PM
Exit mobile version