मराठमोळ्या ऐश्वर्याची विम्ब्लडन वारी, अंडर – १४ चॅम्पियनशिपमधील एकमेव भारतीय

मराठमोळ्या ऐश्वर्याची विम्ब्लडन वारी, अंडर – १४ चॅम्पियनशिपमधील एकमेव भारतीय

कोल्हापूरच्या मराठमोळ्या ऐश्वर्या जाधवने भारताचा तिरंगा थेट लंडन पर्यंत पोहोचवला आहे. लंडन मध्ये सुरु असलेल्या विम्बल्डन स्पर्धेमध्ये भारतीय तिरंगा डौलाने फडकावला. ही बाब सर्वच भारतीयांसाठी अभिमानाची आहे. ऐश्वर्याने महाराष्ट्रासह भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. अंडर – १४ चॅम्पियनशिपमध्ये निवड झालेली ऐश्वर्या पहिलीच भारतीय आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऐश्वर्याचा जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या ऍंड्रिया सोराने पराभव केला. ऐश्वर्याने तिला तगडी लढत सुद्धा दिली. पहिल्या सामन्यात पराभव झाला तरीही ऐश्वर्याच्या हातात आणखी दोन सामने आहेत. राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये ऐश्वर्याने हे दोन्ही सामने जिंकले तर तिचा पुढल्या फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कोल्हापूरच्या य मराठमोळ्या लेकीने केलेली कामगिरी अभिमानस्पद आहे.

हे ही वाचा – इलेक्ट्रिक महामार्ग बनविण्याच्या सरकारी योजनेबाबत गडकरींची मोठी घोषणा

कुटुंबाला श्रेय

ऐश्वर्याचा जन्म २००८ साली कोल्हापूरच्या पन्हाळ्यातील युवलुज झाला. ऐश्वर्यच्या करियरच्या दृष्टीने तिच्या आई – वडिलांनी कोल्हापुरातच राहण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्याने सुद्धा तिच्या या सगळ्या यशाचं श्रेय तिच्या कुटुंबाला दिले आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच ऐश्वर्याची रॅकेटशी ओळख झाली होती. त्यानंतर तिने तिच्या वयाच्या नावव्या वर्षांपासून स्पर्धांमध्ये भाग घायाळ सुरुवात केली. आणि त्यानंतर ऐश्वर्या आणि रॅकेट हि एक नवी जोडीचं तयार झाली. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर ऐश्वर्याने यश संपादन केले.

हे ही वाचा – जेम्स वेब टेलिस्कोपने टिपली अवकाशातील काही खास दृश्य

दरम्यान ऐश्वर्या जाधवने जी कामगिरी केली त्यामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अशातच राजकीय वर्तुळातूनही ऐश्वर्याचे कौतुक होत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विटरवर पोस्ट शेअर करत ऐश्वर्याचे कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे मन:पूर्वक अभिनंदन! ऐश्वर्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि यशाची सर्व शिखरं तिला गाठता येवो, यासाठी तिला मनापासून शुभेच्छा! Proud of you, Aishwarya!’
अशी पोस्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐश्वर्या जाधवचं कौतुक केलं आहे.
हे ही वाचा –  श्रीलंकेच्या या अराजकतेस जबाबदार कोण , सरकार की चीनशी केलेली जवळीक?

 

First Published on: July 12, 2022 1:15 PM
Exit mobile version