Indonesia Open : पी.व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; चुरशीच्या लढतीत जपानच्या ओहोरीचा केला पराभव

Indonesia Open : पी.व्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; चुरशीच्या लढतीत जपानच्या ओहोरीचा केला पराभव

दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या पी.व्ही सिंधूने इंडोनेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने बुधवारी झालेल्या सामन्यात जपानच्या अया ओहोरीचा पराभव केला. तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात शानदार खेळी करून विजय मिळवत सिंधूने चांगलाच कमबॅक केला. दरम्यान गतविजेत्या सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करून तब्बल एक तास आणि दहा मिनिटे चाललेल्या सामन्यात जपानच्या ओहोरीचा १७-२१, २१-१७, २१-१७ अशा फरकाने पराभव केला. विजयासोबतच सिंधूने जपानच्या खेळाडूविरूध्दचा तिचा विक्रम आणखी सुधारला. सिंधूचा ओहोरीसोबत ११-० असा विक्रम केला आहे.

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पी.व्ही सिंधूचा पुढच्या फेरीत जर्मनीच्या २३ वर्षीय बॅडमिंटनपटू यवोन सोबत सामाना असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे तिसऱ्या मानांकित भारतीय असलेल्या आणि जागतिक क्रमवारीत २६ व्या क्रमांकावर असलेल्या ली यांच्यातील पहिला सामना होणार आहे. तर अन्य एका सामन्यात एन सिक्की रेड्डी आणि ध्रुव कपिला या मिश्र दुहेरीच्या जोडीला पहिल्या फेरीतून क्योहेई यामाशिता आणि नारु शिनोया या जपानी जोडीकडून ७-२१, १२-२१ अशा मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.

सिंधूचा शानदार कमबॅक

बालीमध्ये झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अपेक्षेला मोठा धक्का बसला होता. जेव्हा भारताची स्टार बॅडमिंडनपटू पी.व्ही सिंधूचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव झाला होता. सिंधूचा जपानच्या अकाने यामागुचीने सरळ सेटमध्ये पराभव केला होता. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूचा जपानच्या अकाने यामागुचीविरूध्द शानदार विक्रम असताना देखील सिंधूला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे बुधवारच्या सामन्यात शानदार विजय मिळवून सिंधूने चांगला कमबॅक केला आहे.


हे ही वाचा: Wrestling National Championship : पैलवानांना भारतीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा; कुस्तीपटूंसाठी होणार कुस्ती रँकिंग टूर्नामेंट


 

First Published on: November 24, 2021 4:52 PM
Exit mobile version