IPL 2022: दीपक चहरला पुन्हा दुखापत; चेन्नईच्या संघासमोर मोठं संकट

IPL 2022: दीपक चहरला पुन्हा दुखापत; चेन्नईच्या संघासमोर मोठं संकट

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल)च्या पंधराव्या पर्वात चेन्नईनं अद्याप विजयाचा नारळ फोडलेला नाही. त्यातच यंदाच्या पर्वासाठी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यानं चेन्नईचं कर्णधारपद सोडलं. त्यानतर फिरकीपटू रविंद्र जाडेजाकडे चेन्नईचे कर्णधारपद सोपवण्यात आलं. परंतु, रविंद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सध्या पराभवाची मालिका सुरू आहे. त्यामुळं मोठं संकट सध्या चेन्नई समोर उभं आहे. अशातच आता आणखी संकटाचा सामना चेन्नईच्या संघाला करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच कारण म्हणजे चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अष्टपैलू दीपक चहर हा संपूर्ण आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता चेन्नई या संकटातून मार्ग कसा काढते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू अष्टपैलू दीपक चहर हा संपूर्ण आयपीएलमधून माघार घेण्याची शक्यता आहे. हंगामातील चार सामने खेळून झाल्यावरही अद्याप चेन्नईला एकही विजय मिळवता आलेला नाही. दीपक चहरशिवाय संघाच्या वेगवान गोलंदाजीत हवा तो प्रभाव दिसत नाही. अशा स्थितीत दीपक चहरचे तंदुरूस्त नसणे हा चेन्नईसाठी मोठा धक्का मानला जात आहे.


हेही वाचा – IPL 2022 : “लपून क्रिकेट खेळायचो…”; RCB च्या आकाशदीपनं सांगितला आयपीएलपर्यंतचा प्रवास

First Published on: April 12, 2022 3:17 PM
Exit mobile version